घरक्रीडाVirat kohli captaincy : विराट कोहलीला कर्णधारपद सोडायला भाग पाडले, शोएब अख्तरचा...

Virat kohli captaincy : विराट कोहलीला कर्णधारपद सोडायला भाग पाडले, शोएब अख्तरचा गंभीर आरोप

Subscribe

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक गंभीर व्यक्तव्य केलंय. विराटला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले आणि संपूर्ण लॉबी त्याच्या विरोधात असल्याचा आरोप शोएब अख्तरने केला आहे. शोएब सध्या मस्कतमध्ये लेजंड क्रिकेट लीग खेळत असून त्याने एएनआयला मुलाखत दिली होती. त्यावेळी तो म्हणाला की, विराटने कर्णधारपद स्वत:हून सोडलेले नाही तर त्याला ते सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले, असा आरोप करत त्याने टीम इंडियाविरोधात लॉबीचं चित्र तयार केलंय.

तिसऱ्या वनडे मालिके दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळण्यात आलेल्या सामन्याबाबत त्याने मुलाखतीत वक्तव्य केलं आहे. कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बोलताना शोएब म्हणाला की, टीम इंडियाच्या उस्तादला कर्णधारपद का सोडावे लागले ? असा सवाल त्याने केला. विराट सध्या कठीण काळातून जात आहे. परंतु त्याला स्वत:ला सिद्ध करून दाखवावे लागणार आहे की तो चांगला व्यक्ती आहे की खेळाडू?. विराटने आता जास्त काहीही न करता फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावे. कारण तो एक महान फलंदाज आहे आणि जागतिक क्रिकेटमध्ये त्याने इतरांपेक्षा जास्त नाव मिळवले आहे, असं शोएब म्हणाला.

- Advertisement -

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका १-२ अशी गमावल्यानंतर त्याने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. खेळाच्या सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्यानंतर तो फक्त फलंदाजाची भूमिका साकारत आहे. कोहलीने कर्णधारपद सोडल्यापासून टीम इंडियामध्ये बऱ्याच घडामोडी होताना दिसत असल्याचं शोएब म्हणाला.


हेही वाचा : IPL 2022 : आयपीएलच्या लिलावासाठी श्रीसंत सज्ज, इतकी ठेवली बेस प्राइस

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -