घरक्रीडासायना, सिंधू दुसर्‍या फेरीत

सायना, सिंधू दुसर्‍या फेरीत

Subscribe

सिंगापूर ओपन बॅडमिंटन

भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांतनेही या स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. तसेच पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा आणि एच. एस. प्रणॉय यांनाही आपापले सामने जिंकण्यात यश आले. साई प्रणित आणि मुग्धा आग्रे यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

सर्वात आधी कोर्टवर उतरलेल्या पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या लिअ‍ॅनी अलेसॅन्ड्रा मेनाकिला २१-९, २१-७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. लिअ‍ॅनीची सिंधूसमोर डाळ शिजली नाही आणि सिंधूने सहजपणे हा सामना जिंकला. तिचा दुसर्‍या फेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या मिया ब्लिचफेल्डशी सामना होईल. सहाव्या सीडेड सायना नेहवालने इंडोनेशियाच्या युलिया योसेफिन सुसांटोचा २१-१६, २१-११ असा पराभव करत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. या फेरीत तिचा थायलंडच्या पोर्नपावी चोचुवॉन्गशी सामना होईल. चोचुवॉन्गने पहिल्या फेरीत भारताच्याच मुग्धा आग्रेला २१-६, २१-८ असे पराभूत केले.

- Advertisement -

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किदाम्बी श्रीकांतने थायलंडच्या सिथिकोम थम्मासिनवर २१-१७, २१-१८ अशी मात केली. तसेच पारुपल्ली कश्यपने रॅस्मस गेमकेचा २१-१९, २१-१४ असा, समीर वर्माने अविहिंगसेनॉनचा २१-१४, २१-६ असा, एच. एस. प्रणॉयने फ्रान्सच्या ब्राइस लेवर्डझचा ११-२१, २१-१६, २१-१८ असा पराभव करत स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. साई प्रणितला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला जपानच्या अव्वल सीडेड केंटो मोमोटाने १९-२१, २१-१४, २२-२० असे पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -