Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा AUS vs SL: कर्णधार शनाकाने अखेरच्या षटकात श्रीलंकेला जिंकवले, पण मालिका ऑस्ट्रेलियाच्या...

AUS vs SL: कर्णधार शनाकाने अखेरच्या षटकात श्रीलंकेला जिंकवले, पण मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Subscribe

स्मिथ आणि स्टॉइनिस यांनी ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत फिंच आणि वॉर्नर या जोडीने ऑस्ट्रेलियन संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या.

श्रीलंका (Sri Lanka) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना श्रीलंकेने चार गडी राखून जिंकला. पहिले दोन सामने गमावून मालिका आधीच गमावलेल्या श्रीलंकेचा संघ सन्मान वाचवण्यासाठी हा सामना खेळत होता. यासाठी ऑस्ट्रेलियाला दोन सामने जिंकून मालिका आपल्या खिशात घातली होती.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने एक चेंडू राखून १७७ धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने करिष्माई खेळी खेळून आपल्या संघाला जिंकून दिले. सध्या श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून हा देश आर्थिक संकटातून जात आहे. कठीण परिस्थितीत देशातील जनतेमध्ये निराशेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आपल्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. श्रीलंकेच्या विजयानंतर चाहते भावूक झाले आणि त्यांनी बराच वेळ विजय साजरा केला.

- Advertisement -

स्मिथ आणि स्टॉइनिस यांनी ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत फिंच आणि वॉर्नर या जोडीने ऑस्ट्रेलियन संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावा जोडल्या. फिंचने 29 आणि वॉर्नरने 39 धावा केल्या. यानंतर स्टीव्ह स्मिथच्या नाबाद 37 आणि मार्कस स्टॉइनिसच्या 38 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 176 पर्यंत पोहोचली. श्रीलंकेकडून महिष तिक्षाने दोन, वनिंदू हसरंगा आणि जयविक्रिमाने प्रत्येकी एक गडी बाद केला. करुणारत्नेला विकेट मिळाली नाही, पण त्याने चपखल गोलंदाजी केली.

177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात काही खास झाली नाही. 25 धावांवर पहिली विकेट पडली. दानुष्का गुणातिलका 15 धावा करून बाद झाला. पथुम निशांकाने 27 आणि चरित असलंकाने 26 धावा केल्या. शेवटी कर्णधार दासून शनाकाने नाबाद 54 आणि चमिका करुणारत्नेने 14 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिस आणि जोस हेझलवूडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी अॅश्टन अगर आणि जे रिचर्डसन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

- Advertisement -

श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या झंझावाती फलंदाजीमुळे श्रीलंकेच्या संघाने शेवटच्या तीन षटकांत ५९ धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला. शनाकाने 25 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. श्रीलंकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज होती आणि शनाकाने दोन चौकारांनंतर षटकार खेचून संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, केन रिचर्डसनने शेवटचा चेंडू वाईड टाकल्याने शनाकाला विजयी धाव घेण्याची संधी मिळाली नाही.

- Advertisment -