घरक्रीडाAustralian Open : भारताच्या सुमित नागलचे आव्हान संपुष्टात; नदालची विजयी सुरुवात     

Australian Open : भारताच्या सुमित नागलचे आव्हान संपुष्टात; नदालची विजयी सुरुवात     

Subscribe

नागलला रिकार्डस बेरांकीसने पराभूत केले.

भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागलचे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पहिल्या फेरीत नागलला रिकार्डस बेरांकीसने २-६, ५-७, ३-६ असे पराभूत केले. या सामन्यात नागलला चांगला खेळ करता आला नाही. बेरांकीसने पहिला सेट ६-२ असा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये नागलने काहीशी झुंज दिली. मात्र, बेरांकीसने हा सेट ७-५ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा बेरांकीसने त्याचा खेळ उंचावला. त्याने हा सेट ६-३ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली. दुसरीकडे चौथ्या सीडेड डॅनिल मेदवेदेव्हला विजयी सलामी देण्यात यश आले. त्याने वासेक पोस्पिसीलचा ६-२, ६-२, ६-४ असा पराभव केला.

- Advertisement -

नदालची देरेवर मात

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालला ऑस्ट्रेलियन ओपनची विजयी सुरुवात करण्यात यश आले. दुसऱ्या सीडेड नदालने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या लास्लो देरेचा ६-३, ६-४, ६-१ असा पराभव केला. दुखापतीमुळे नदालला मागील आठवड्यात झालेल्या एटीपी कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. मात्र, ऑस्ट्रेलियन ओपनच्या सलामीच्या लढतीत या दुखापतीवरही त्याने मात केली. महिलांमध्ये अव्वल सीडेड ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ली बार्टीने डांका कोव्हीनिचचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला.

- Advertisement -

हेही वाचा – पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा ‘या’ कारणांमुळे पराभव!


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -