IND vs SA : अश्विनने मिलरला बाद केले नाही अन् भारताच्या विजयाची संधी हुकली

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने 5 विकेट्स ठेवून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारताच्या कालच्या सामन्यातील काही चुका समोर आल्या आहेत. तसेच, या सामन्यात भारताने सामना विजयासाठीच्या अनेक संध्याही सोडल्या आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने 5 विकेट्स ठेवून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारताच्या कालच्या सामन्यातील काही चुका समोर आल्या आहेत. तसेच, या सामन्यात भारताने सामना विजयासाठीच्या अनेक संध्याही सोडल्या आहेत. त्यानुसार भारताचा फिरकीपटी रविचंद्रन अश्विन हा सध्या विजयासाठीची संधी हुकल्याने ट्रोल होताना दिसत आहे. कारण, अश्विनला एक संधी होती जेव्हा तो डेव्हिड मिलरचा डाव संपवू शकला असता पण त्याने तसे केले नाही. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (T20 World Cup R Ashwin Did Not Run Out Mankading To David Miller Video Viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला डेव्हिड मिलरला धावबाद करण्याची (मंकडींग) संधी होती. मात्र, रविचंद्रन अश्विनने तसे केले नाही. हा व्हिडिओ T20 विश्वचषकाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

अश्विनने कालच्या सामन्यात 4 षटकात 43 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. विशेष म्हणजे अश्विनने 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. यादरम्यान अश्विनला एक संधी होती जेव्हा तो डेव्हिड मिलरचा डाव संपवू शकला असता पण त्याने तसे केले नाही. आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यात भारताला 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भारत आता विश्वचषकातील ब गटाच्या गुणतालिकेत 2वर घसरला आहे. भारतीय संघाचे 3 सामन्यांत 4 गुण आहेत, तर अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे तेवढ्याच सामन्यांत 5 गुण आहेत. बांगलादेश 4 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर तर झिम्बाब्वे 4 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – IND vs SA : भारताचा पहिला पराभव; दक्षिण आफ्रिकेचा 5 विकेट राखून विजय