घरक्रीडाT20 World Cup : विंडीजच पुन्हा जेतेपद पटकावणार; माजी कर्णधार सॅमीचा विश्वास 

T20 World Cup : विंडीजच पुन्हा जेतेपद पटकावणार; माजी कर्णधार सॅमीचा विश्वास 

Subscribe

यंदाचा टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

गतविजेता वेस्ट इंडिज संघ यंदाही टी-२० वर्ल्डकपचे (T20 World Cup) जेतेपद पटकावणार, असा माजी कर्णधार डॅरेन सॅमीला विश्वास आहे. सॅमीच्या नेतृत्वातच विंडीजने २०१६ साली झालेल्या अखेरच्या टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले होते. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात कार्लोस ब्रेथवेटने मारलेल्या चार षटकरांमुळे विंडीजने इंग्लंडला पराभूत करत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. विंडीजच्या संघात मॅचविनर खेळाडूंची भरणा असून हा संघ परिस्थितीशी लवकरच जुळवून घेतो. त्यामुळे विंडीजचा संघ जेतेपदाचा प्रमुख दावेदार असल्याचे सॅमीला वाटते.

आक्रमक शैलीत खेळणारे खेळाडू संघात

वेस्ट इंडिजच यंदाही टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावणार यात जराही शंका नाही. मी विंडीजचा माजी खेळाडू असल्याने त्यांच्या बाजूने बोलत असल्याचे लोकांना वाटू शकेल. परंतु, आमच्या संघाला मागील तीन टी-२० वर्ल्डकप स्पर्धांची अंतिम फेरी गाठण्यात यश आले होते आणि आम्ही दोन वेळा जेतेपद पटकावले. आमच्याकडे कर्णधार किरॉन पोलार्ड, क्रिस गेल, आंद्रे रसेल, जेसन होल्डर आणि एव्हिन लुईससारखे उत्कृष्ट खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये आक्रमक शैलीत खेळ प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्याची क्षमता आहे, असे सॅमी म्हणाला.

- Advertisement -

रसेल ठरू शकेल सर्वोत्तम खेळाडू 

यंदा युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे संघही चांगली कामगिरी करतील, असे सॅमीला वाटते. तसेच विंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचेही सॅमी म्हणाला. अव्वल तीनमध्ये खेळणारा विराट कोहलीसारखा एखादा फलंदाज या स्पर्धेत सर्वाधिक धावा करेल. परंतु, फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत योगदान देणाऱ्या आंद्रे रसेलसारख्या खेळाडूमुळेच संघ विजयी ठरतात. तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकू शकेल.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -