घरक्रीडाबांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालसोबत सोशल मीडियावर घडले असे काही, पाहून वाटेल आश्चर्य!

बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालसोबत सोशल मीडियावर घडले असे काही, पाहून वाटेल आश्चर्य!

Subscribe

तमिम हा शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहीम यांच्यासह बांगलादेशचा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे.

बांगलादेशच्या संघाने सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बांगलादेशने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, या दरम्यान बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार तमिम इक्बालसोबत सोशल मीडियावर जे घडले, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. तमिम हा शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहीम यांच्यासह बांगलादेशचा सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. त्यामुळे त्याचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत. मात्र, आता तमिमच्या स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटपेक्षा त्याच्या फॅन इंस्टाग्राम अकाऊंटवर जास्त फॉलोअर्स झाले आहेत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

tamim iqbal followers on insta
तमिमच्या इंस्टाग्राम अकाऊंटपेक्षा त्याच्या फॅनने बनवलेल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जास्त फॉलोअर्स

फॅन अकाऊंटचे जास्त चाहते

अन्य क्रिकेटपटूंप्रमाणेच तमिमसुद्धा इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. मात्र, जवळपास सर्वच लोकप्रिय खेळाडूंचे चाहते या खेळाडूंच्या नावाने ‘फॅन अकाऊंट’ बनवतात. तमिमच्या एका चाहत्याने बनवलेल्या ‘तमिम इक्बाल २८ फॅन क्लब’ या अकाऊंटचे १० लाख (१ मिलियन) फॉलोअर्स असून तमिमच्या स्वतःच्या अकाऊंटचे ९ लाख ५१ हजार फॉलोअर्स आहेत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

बांगलादेशचा प्रमुख फलंदाज

तमिम हा बांगलादेशचा प्रमुख फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत ६४ कसोटी आणि २१५ एकदिवसीय सामन्यांतबांगलादेशचे प्रतिनिधित्व केले असून अनुक्रमे ४७८८ आणि ७५१७ धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम तमिमच्याच नावे आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -