TATA IPL Title Sponsor : आयपीएलचा ‘विवो’ला अलविदा, यंदाच्या हंगामात नव्या टायटल स्पॉन्सरची एन्ट्री

आयपीएल २०२२चे हंगाम अनेक अर्थाने आणि भरपूर खास होणार आहे. कारण यंदा आयपीएलसाठी मेगा ऑक्शन घेण्यात येणार आहे. सोबतच विवोचे टायटल स्पॉन्सरचे शेवटचे वर्ष असेल.

TATA IPL Title Sponsor tata group replace vivo in ipl 2022 season tournament
TATA IPL Title Sponsor : आयपीएलचा 'विवो'ला अलविदा, यंदाच्या हंगामात नव्या टायटल स्पॉन्सरची एन्ट्री

आयपीएल २०२२ साठी नवीन टायटल स्पॉन्सर मिळाला असून टाटा ग्रुपकडे टायटल स्पॉन्सरची कमान असेल. टाटा कंपनीने चीनच्या विवो कंपनीची जागा घेतली आहे. यामुळे टाटा आयपीएल अशा नावाने यंदाचा हंगाम ओळखण्यात येणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये टाटा आयपीएल टायटल असेल अशी माहिती आयपीएल अध्यक्ष ब्रीजेश पटेल यांनी दिली आहे.

आयपीएल गव्हर्निंग काउंसिलची मंगळवारी बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये टाटा कंपनीला आयपीएल टायटल बनवण्याबाबत निर्णय झाला आहे. तसेच अहमदाबादच्या टीमला खरेदी करणाऱ्या सीवीसी ग्रुपला लेटर ऑफ इंटेंट सोपवण्यात आले आहे.

विवो कंपनीने २०१८ मध्ये आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपचे अधिकार खरेदी केले होते. या करारामध्ये कंपनी बीसीसीआईला प्रत्येक वर्षी ४४० करोड रुपये देणार होती. विवोचा करार २०२२ पर्यंत होता. मागील वर्षी भारत-चीनमध्ये तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या कंपनीला १ वर्षांची विश्रांती देण्यात आली होती.

आयपीएल २०२२चे हंगाम अनेक अर्थाने आणि भरपूर खास होणार आहे. कारण यंदा आयपीएलसाठी मेगा ऑक्शन घेण्यात येणार आहे. सोबतच विवोचे टायटल स्पॉन्सरचे शेवटचे वर्ष असेल. एवढेच नाही तर आयपीएलला लवकरच नवीन मीडिया स्पॉन्सर सुद्धा मिळणार आहे. कारण स्टारसोबत असलेला करा २०२२ मध्ये संपणार आहे.


हेही वाचा : IND vs SA मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचा संन्यास, IPL चा सर्वात महागडा खेळाडू