घरक्रीडामौका... मौका! भारत विरुद्ध पाकिस्तानचा मुकाबला; नव्या जर्सीत भारतीय संघ सज्ज

मौका… मौका! भारत विरुद्ध पाकिस्तानचा मुकाबला; नव्या जर्सीत भारतीय संघ सज्ज

Subscribe

आशिया चषक 2022 चा उद्याचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दुबईच्या ज्या स्टेडीयममध्ये हा सामना होणार आहे. त्यामध्ये भारताच्या कटू आठवणी आहेत. याच स्टेडीयमवर गतवर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता.

आशिया चषक 2022 चा उद्याचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दुबईच्या ज्या स्टेडीयममध्ये हा सामना होणार आहे. त्यामध्ये भारताच्या कटू आठवणी आहेत. याच स्टेडीयमवर गतवर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. तसेच, विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला होता. मात्र, आता पुन्हा एकदा भारतीय संघ आशिया चषकामध्ये पाकिस्तानशी मुकाबला करणार आहे. त्यामुळे सर्वत्र ‘मौका… मौका’, असे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय संघ उद्याचा सामना जिकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (team india and pakistan team in new jersey for asia cup 2022)

आशिया खंडातील देशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्पर्धा असणाऱ्या आशिया कप 2022 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. आजचा पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. या महामुकाबल्यासाठी भारातीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ या सामन्यासाठी नव्या जर्सीत खेळणार आहे.

- Advertisement -

या दोन्ही संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले असून, बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबीने (PCB) आपआपल्या अधिकृत ट्वीटरवर खेळाडूंचे नव्या जर्सीतील व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम इंडिया नव्या जर्सीत फोटोशूट सेशन करताना दिसत आहेत. या फोटो सेशनमध्ये कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul), ऋषभ पंत (Rishabh Pant), रवी अश्विन (Ravi Ashwin), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांसह इतर खेळाडू दिसत आहेत.

- Advertisement -

पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team) देखील आपल्या नवी-कोरी जर्सीचे अनावरण करत दुबईत फोटोशूट केलं आहे. या सर्वाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या ट्वीटरवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडू देखील फोटोशूटमध्ये दिसत आहेत.


हेही वाचा – आशिया चषक स्पर्धेला दुबईत आजपासून सुरुवात, श्रीलंका-अफगाणिस्तान भिडणार आमनेसामने

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -