घरक्रीडाबीसीसीआयचा ग्रीन क्रिकेटसाठी पुढाकार, UN, BCCIमध्ये करार

बीसीसीआयचा ग्रीन क्रिकेटसाठी पुढाकार, UN, BCCIमध्ये करार

Subscribe

क्रिकेटच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी बीसीसीआय आणि युएन एकत्र आले आहेत. त्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये २७मे रोजी मुंबईत करार देखील झाला. IPLच्या अकराव्या सीझनची फायनल मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगली. त्यावेळी BCCIचे सेक्रेटरी अमिताभ चौधरी आणि संयुक्त राष्ट्राचे कार्यकारी संचालक एरिक सॉलहेम या दोघांनीही या करारावर सह्या केल्या.

- Advertisement -

कराराचा उद्देश

देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाच्या समस्या या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यासंबंधी लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे, उपाय शोधणे हा करारामागील मुख्य हेतू आहे. क्रिकेट आणि फॅन्स हे एक वेगळे नाते आहे. त्याचाच फायदा घेत लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृकता निर्माण करण्याचा दोन्ही संस्थांचा उद्देश आहे. क्रिकेटच्या मैदानावर देखील प्लॅस्टिकचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यावर नियंत्रण मिळवणे आणि फॅन्समध्ये जागृकता आणण्यासाठी बीसीसीआय आणि युएन प्रयत्नशील असणार आहे. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान प्लास्टिकच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ, होर्डिंग्जचा वापर केला जाणार आहे. शिवाय प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर कशा प्रकारे आळा घालता येईल? यासाठी देखील दोन्ही संस्था प्रयत्नशील असणार आहेत.

- Advertisement -

इंदौरमधल्या होळकर स्टेडियमवर प्रायोगिक तत्त्वावर ग्रीन प्रोटोकॉल तयार करण्यात आला. ज्याद्वारे प्लॅस्टिकचा कमी वापर, पुर्नवापर आणि पुनर्निर्मिती या त्रिसुत्रीचा वापर केला गेला. प्लास्टिकचा वापर आणि व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणण्यासाठी एक ऑडिट देखील करण्यात येत आहे. होळकर स्टेडियम प्रमाणेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर देखील प्लास्टिकच्या वापराला फाटा देत पर्यावरणाच्या हिताचा विचार केला गेला. त्यासाठी प्लास्टिकला पर्याय ठरू शकणाऱ्या गोष्टींचा विचार केला गेला.

फॅन्सचा प्रतिसाद महत्त्वाचा

बीसीसीआय आणि युएनचा उपक्रम स्तुत्य आहे. पण फॅन्स किती प्रतिसाद देतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. शिवाय त्याची काटेकोर अंमलबजावणी देखील महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय, फॅन्स याला कसा प्रतिसाद देतात? हेही लवकरच स्पष्ट होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -