घरक्रीडाTokyo Olympics : चुका करणे पडले महागात; पुरुष दुहेरीतील पराभवानंतर चिरागचे विधान

Tokyo Olympics : चुका करणे पडले महागात; पुरुष दुहेरीतील पराभवानंतर चिरागचे विधान

Subscribe

आम्ही प्रतिस्पर्धी जोडीला सहज गुण जिंकू दिले, असे चिराग म्हणाला.

पहिल्या सामन्यात तिसऱ्या सीडेड जोडीचा पराभव केल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकच्या पुरुष दुहेरीतील दुसऱ्या सामन्यात सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला. ‘अ’ गटातील दुसऱ्या सामन्यात केविन संजया सुका आणि मार्कस फेर्नांल्दी गिडेऑन या इंडोनेशियाच्या पहिल्या सीडेड जोडीने सात्विक आणि चिरागचा १३-२१, १२-२१ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या सामन्यात चुका करणे महागात पडल्याचे सामन्यानंतर चिराग म्हणाला.

‘आम्ही दोन्ही गेममध्ये चांगली सुरुवात केली होती. दुसऱ्या गेममध्ये आम्ही महत्त्वाचे गुण जिंकत ६-३ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र आम्ही चुका करण्यास सुरुवात केली. परंतु, इंडोनेशियाच्या जोडीने उत्तम खेळ केला. त्यामुळे त्यांना श्रेय दिले पाहिजे. मात्र, आम्ही त्यांना सहज गुण जिंकू दिले. त्यामुळे हा सामना गमावल्याबद्दल आम्ही निराश आहोत,’ असे चिराग म्हणाला.

- Advertisement -

सात्विकही चिरागशी सहमत होता. ‘इंडोनेशियन जोडीच्या सर्व्हिसवर आम्हाला गुण मिळवता आले नाहीत,’ असे सात्विकने सांगितले. आता ‘अ’ गटात सात्विक आणि चिरागला बेन लेन आणि सिन वॅण्डी या जोडीला पुढील सामन्यात पराभूत करावे लागले. तसेच ली यांग आणि वांग ची-लिन ही चिनी तैपेईची जोडी इंडोनेशियाच्या अव्वल सीडेड जोडीकडून पराभूत होईल अशी आशा करावी लागेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -