घरक्रीडाTokyo Olympics : टेबल टेनिसमधील भारताचे आव्हान संपुष्टात; शरथ कमल पराभूत

Tokyo Olympics : टेबल टेनिसमधील भारताचे आव्हान संपुष्टात; शरथ कमल पराभूत

Subscribe

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांतील भारताचे टेबल टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

भारताचा अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या या पराभवामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांतील भारताचे टेबल टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले आहे. महिलांमध्ये मनिका बात्रा आणि सुतिर्था मुखर्जी, तर पुरुषांमध्ये साथियन याआधीच पराभूत झाले होते. शरथ कमलवर भारताची मदार होती. परंतु, तिसऱ्या फेरीत त्याच्यापुढे चीनचा महान टेबल टेनिसपटू मा लॉंगचे आव्हान होते. शरथने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर लॉंगने उत्कृष्ट खेळ करत हा सामना ४-१ अशा फरकाने जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

पहिल्या तीन गेममध्ये उत्तम झुंज

ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धांमधील गतविजेत्या मा लॉंगला पराभूत करण्यासाठी शरथला सर्वोत्तम खेळ करावा लागणार होता. त्याने पहिल्या तीन गेममध्ये दुसऱ्या सीडेड लॉंगला उत्तम झुंज दिली. पहिला गेम लॉंगने ११-७ असा जिंकला. मात्र, शरथने दमदार पुनरागमन केले आणि दुसरा गेम ११-८ अशा फरकाने जिंकला. तिसऱ्या गेममध्ये ११-११ अशी बरोबरी होती. परंतु, पुढील दोन्ही गुण जिंकत लॉंगने हा गेम १३-११ असा जिंकला. यानंतर मात्र लॉंगने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या हल्ल्यापुढे शरथचा निभाव लागला नाही. लॉंगने पुढील दोन गेम ११-४ आणि ११-४ अशा फरकाने जिंकत सामन्यात बाजी मारली.

- Advertisement -

मनिका, सुतिर्था आधीच पराभूत

त्याआधी सोमवारी मनिका बात्रा आणि सुतिर्था बॅनर्जीला पराभव पत्करावा लागला होता. महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत मनिकाला १० व्या सीडेड ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कानोव्हाने ०-४ (८-११, २-११, ५-११, ७-११) असे पराभूत केले होते. तर महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सुतिर्था मुखर्जीवर पोर्तुगालच्या फु युने ०-४ अशी मात केली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -