घरक्रीडाप्रयत्न केले पण दिवस आपला नव्हता...

प्रयत्न केले पण दिवस आपला नव्हता…

Subscribe

विराट कोहली, विरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी महिला क्रिकेट संघाचं कौतूक केलं आहे.

मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या आयसीसी महिला टी -20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धुळ चारत पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना ८५ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात भारताने सुमार क्षेत्ररक्षण केले. याचा फटका भारतीय संघाला बसला. भारतीय संघ पराभूत झाला असला तरी त्यांच्या संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीवर आजी-माजी खोळाडूंनी कौतूक केले आहे. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने प्रयत्न केले, पण दिवस त्यांचा नव्हता, असे म्हटले आहे.

भारतीय महिला संघाने टी-२० विश्वचषकात झुंजार खेळ केला. त्यांचा अभिमान आहे. तुम्ही दमदार पुनरागमन करुन भविष्यात खूप यश मिळवाल याची खात्री आहे. – विराट कोहली

- Advertisement -

आपल्या मुलींनी सर्वोतपरी प्रयत्न केले, पण दिवस त्यांचा नव्हता. मात्र, अंतिम सामना वगळता त्या ज्याप्रकारे खेळल्या, ते पाहून खूप बरे वाटले. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा. महिला टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन. – विरेंद्र सेहवाग

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन संघाचे महिला टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. मी भारतीय महिला संघाला सांगू इच्छितो की, त्यांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. या संपूर्ण स्पर्धेत त्यांचा खेळ पाहताना खूप मजा आली. त्यांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. – व्ही.व्ही.एस लक्ष्मण

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -