घरक्रीडाव्यंकटेश अय्यरची दमदार फलंदाजी; क्रिकेटसाठी सोडला सीएचा अभ्यास

व्यंकटेश अय्यरची दमदार फलंदाजी; क्रिकेटसाठी सोडला सीएचा अभ्यास

Subscribe

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सीजनमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे.

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सीजनमध्ये कोलकाता नाइट राइडर्सचे व्यंकटेश अय्यर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. २६ वर्षीय फलंदाजाने गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध ३० चेंडूत ५३ धावांची दमदार खेळी खेळली. या झंझावाती खेळीत व्यंकटेशने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले. यापूर्वी व्यंकटेशची कामगिरी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या पदार्पणतही दिसून आली. २० सप्टेंबरला खेळलेल्या सामन्यात व्यंकटेशने २७ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.

क्रिकेट खेळण्यासाठी आईचे प्रोत्साहन

व्यंकटेश अय्यर याचा जन्म इंदूर येथे दक्षिण भारतीय कुटूंबात झाला. व्यंकटेशला अभ्यासाबाबत घरातून काहीच दबाव नव्हता. अभ्यासापेक्षा खेळांवर जास्त लक्ष देण्यास प्रोत्साहित केले. व्यंकटेश अय्यर याचा जन्म इंदूर येथे दक्षिण भारतीय कुटुंबात झाला. व्यंकटेशच्या कुटुंबाने त्याला अभ्यासापेक्षा खेळांवर जास्त लक्ष देण्यास प्रोत्साहित केले. व्यंकटेशने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मी खेळायला सुरुवात केली, ती म्हणजे जेव्हा माझ्या आईने माझ्यावर पुस्तके घेऊन घरात बसण्यापेक्षा बाहेर जाऊन खेळण्यासाठी दबाव टाकला. आईचा हा सल्ला असला तरी, व्यंकटेश अय्यर अभ्यासू वृत्तीचा असल्याने अभ्यासाबाबत हुशार होता. सुरूवातील वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत तो क्रिकेट फक्त मनोरंजनासाठी खेळत होता.

- Advertisement -

सीएचे शिक्षण सोडावे लागले

अय्यरने बी कॉमसह सीए मध्ये प्रवेश घेतला. २०१६ मध्ये त्याने सीएचे इंटरमीडिएट पास केले होते. पण तोपर्यंत अय्यरने मध्य प्रदेशच्या वरिष्ठ संघासाठी टी -२० आणि ५० षटकांत पदार्पण केले होते. अशा परिस्थितीत त्यांनी सीएचा अभ्यास सोडून एमबीएला प्रवेश घेतला.’मी माझा सीए सोडून फायनान्समध्ये एमबीए करण्याचा निर्णय घेतला. मी अनेक प्रवेश परीक्षांना बसलो आणि चांगले गुण मिळवले. मग मी सुद्धा एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. मी नशिबवान होतो की प्राध्यपकांनाही माझे क्रिकेट खेळणे आवडले होते. म्हणून त्यानी माझी उपस्थिती आणि नोट्ससह मला खूप मदत केली.’ असे व्यंकटेश अय्यर म्हणाला.

- Advertisement -

व्यंकटेश सौरव गांगुलीचा चाहता 

मुंबई इंडियन्स (MI) विरुद्धच्या सामन्यानंतर व्यंकटेशने सहकारी खेळाडू राहुल त्रिपाठीला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलच्या या प्रवासाबद्दल सांगितले. व्यंकटेश म्हणाला, केकेआर हा पहिला संघ होता ज्यासाठी मला खेळायचे होते कारण सौरव गांगुली सुरुवातीला या संघाचा कर्णधार होता. जेव्हा माझी KKR साठी निवड झाली, तेव्हा ते माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. व्यंकटेश अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने २०२१च्या लिलावात २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या व्यंकटेशने २०१५ मध्ये रेल्वेविरुद्ध टी -२० मध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने सौराष्ट्रविरुद्ध लिस्ट-ए मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २०१८-१९ रणजी हंगामात व्यंकटेश अय्यरला प्रथम श्रेणीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.


हे ही वाचा – कोरोना नियमाचं पालन करून राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -