घरदेश-विदेशLive Update : आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली

Live Update : आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलली

Subscribe

हॉल तिकीट गोंधळानंतर उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यानुसार आरोग्य विभागाकडून एसएमएस, इमेल द्वारे काळविण्यात आले आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना काही तास आधी परीक्षा रद्द झाल्याने मनस्ताप


राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे येत्या ७ ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहेत. दीड वर्षापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. दरम्यान, घटनस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत.

- Advertisement -

यूपीएससीने नागरी सेवा २०२० चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शुभम कुमार या परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. नागरी सेवा परीक्षा २०२० मध्ये ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ५४५ पुरुष आणि २१६ महिला आहेत.


ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी तर शहरी भागात ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू – वर्षा गायकवाड

- Advertisement -

शाळेत उपस्थितीची सक्ती नाही, पालकांची संमती असणं आवश्यक – वर्षा गायकवाड


राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू होणार


दिल्लीतील रोहिणी कोर्टात गोळी झाडून हत्या, जितेंद्र गोगीवर गोळीबार, जितेंद्र गोगीवर गोळीबार करणाऱ्या दोघांचे दिल्ली पोलिसांकडून एन्काऊंटर


सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक सुरु, राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरु, शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर दाखल


साखरेऐवजी इथेनॉलचा तयार झाल्यास प्रदुषण कमी होणार- नितीन गडकरी


कोरोनामुळे सर्व उद्योगधंदे बंद, थिएटर्स सुरु करण्याबाबत विचार सुरु, आमच्यात काही मतभेद नाही, एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे- संजय राऊत


हसन मुश्रीफ यांची आज पत्रकार परिषद


भारतीय जवानांना जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये तीन जवानांना कंठस्तान घालण्यात मोठं यश आलं आहे. हे तीनही दहशतवादी पाकिस्तानचे होते. त्य़ांच्य़ाकडून ५ AK47, ८ पिस्तुल, आणि ७० हॅण्ड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -