घरक्रीडाव्हायरल Video : विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच'

व्हायरल Video : विराट कोहलीचा ‘स्पाइडरमॅन कॅच’

Subscribe

कोहलीनेही कोणती चुक न करता एका हातात हा कॅच पकडला जो सध्या स्पाईडरमॅन कॅच म्हणून व्हायरल होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला (शुक्रवार) आजपासून पर्थ येथे सुरुवात झाली. सामन्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे कारण नव्या ‘पर्थ स्टेडियम’वर होणारा पहिला कसोटी सामना आहे. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात १-० आघाडीनिशी उतरला आहे. या सामन्यात पहिल्या सत्रात भारताला एकही विकेट मिळवता आली नव्हती. मात्र, दुसऱ्या सत्रात भारताने ३ विकेट्स मिळवत सामन्यामध्ये पुनरागमन केले. टी ब्रेक खेळ सुरु झाला आणि काही मिनिटांमध्येच भारताच्या पदरी यश मिळाले. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकॉम्बचा कॅच गेला. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीच्या दिशेने हा कॅच जात होता. कोहलीनेही कोणती चुक न करता हा कॅच पकडला आणि तोही एका हातात. विराटने पकडलेला हा कॅच सध्या ‘स्पाइडरमॅन कॅच’ नावाने व्हायरल होतो आहे. दीपक राज वर्मा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन या स्पाईडरमॅन कॅचचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्याला मुकले आहेत. तर पृथ्वी शॉसुद्धा दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना आपले प्रदर्शन सुधारण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. भारतीय संघाने २००८ मध्ये जुन्या पर्थ स्टेडियमवर झालेला कसोटी सामना ७२ धावांनी जिंकला होता. मात्र, तो विजय वगळता भारताला पर्थमध्ये चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. २०१२ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ १ डाव आणि ३७ धावांनी पराभूत झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -