घरक्रीडाविरुष्काच्या बाळाला भेटण्यासाठी नातेवाईकांनाही 'No Entry'

विरुष्काच्या बाळाला भेटण्यासाठी नातेवाईकांनाही ‘No Entry’

Subscribe

विरुष्काने बाळाला भेटण्यासाठी जवळच्या नातेवाईकांनाही परवानगी दिलेली नाही.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना दोन दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यांच्या घरात एका गोंडस चिमुकलीचे आगमन झाले आहे. विराटने स्वतःहा ही आनंदाची बातमी चाहत्यासोबत शेअर केली होती. तर त्याच्या भावाने म्हणजेच विकास कोहलीने त्यांच्या पुतणीचा फोटो शेअर केला आहे. पण, आता या दोघांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाळाला भेटण्यासाठी त्यांनी जवळच्या नातेवाईकांनाही परवानगी दिलेली नाही. तसेच अनुष्का आणि बाळाची प्रकृती चांगली असून सध्या त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर केला जावा त्यांना प्रायव्हसी दिली जावी, अशी विनंती विराटने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

- Advertisement -

इतकंच नाही तर विटारने शुभेच्छा म्हणून कोणाकडून फुलं किंवा भेटवस्तूही न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनने थैमान घातले आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयामधील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आजूबाजूच्या रुममध्ये येणाऱ्या आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये. याकरता विशेष सोय करण्यात आली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

- Advertisement -

दुसऱ्या मार्गाने घरी पाठवण्याचा विचार

रुग्णालयाबाहेर असलेली गर्दी पाहून अनुष्का आणि मुलीला दुसऱ्या मार्गाने घरी पाठवण्याचा विचार केला जात असल्याचेही म्हटले जात आहे.


हेही वाचा – विरुष्काच्या ‘बेबीगर्ल’चा नवा फोटो व्हायरल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -