Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा आम्ही त्याला जोकर म्हणायचो.., ड्रेसिंगरूममधील ख्रिस गेलचा कोहलीने सांगितला किस्सा

आम्ही त्याला जोकर म्हणायचो.., ड्रेसिंगरूममधील ख्रिस गेलचा कोहलीने सांगितला किस्सा

Subscribe

आयपीएलच्या १६व्या हंगामाला येत्या ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. ही बहुचर्चित स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळुरूने ख्रिस गेले आणि एबी डिव्हिलियर्स अशा दोन खेळाडूंना हॉल ऑफ फेमने सन्मानित केले आहे. दरम्यान, आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंगरुममधील ख्रिस गेलचा किस्सा सांगत दोन्ही खेळाडूंबाबत आठवणींना उजाळा दिला आहे.

विराट कोहलीने ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सबाबत मोठं विधान केले आहे. इथे परत आल्याने खूप छान वाटत आहे. माझ्या दोन मित्रांसोबत येथे येणं हे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आरसीबीकडून खेळत असताना मी या दोन सहकाऱ्यांच्या खूप जवळ आला आहे, असं विराट कोहलीने सांगितले.

- Advertisement -

मैदानात आम्ही अनेक संस्मरणीय क्षण अनुभवले आहेत. आम्ही ख्रिस गेलला जोकर म्हणायचो, कारण तो नेहमी विनोद करायचा आणि लोकांचे मनोरंजन करायचा, असं कोहली म्हणाला. तसेच पुढे त्याने एबी डिव्हिलियर्सवरही विधान केले आहे. एबीबद्दल काय बोलू, फक्त एवढेच सांगू शकतो की, मी त्याच्यावर खूप प्रेम करतो, असं कोहली म्हणाला.

२००९ ते २०२१ सालापर्यंत ख्रिस गेल आयपीएलच्या विविध संघाचा हिस्सा राहिला आहे. मात्र, युनिव्हर्सल बॉस गेलने आयपीएलचे सर्वाधिक सामने आरसीबीकडून खेळले आहेत. तसेच चिन्नास्वामी स्टेडियमवर आरबीसीच्या जर्सी लाँचच्या वेळी ख्रिस गेल आणि डिव्हिलियर्सचाही सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, ख्रिस गेलबद्दल सांगायचं झालं तर, २००९ मध्ये गेलने कोलकाता नाईट रायडर्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो २०११ मध्ये आरबीसीमध्ये सामील झाला आणि २०१७ पर्यंत तो आरसीबीमध्ये खेळला. त्यानंतर त्याचा शेवटचा आयपीएल संघ पंजाब किंग्ज होता. गेलने १४२ आयपीएल सामन्यांमध्ये १४८.९६ च्या स्ट्राइक रेट आणि ३९.७२ च्या सरासरीने ४ हजार ९६५ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १७५ इतकी आहे. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या समजली जाते.


हेही वाचा : धोनीने स्टेडियममधील खुर्च्यांना केले पॉलिश, व्हिडीओ झाला व्हायरल


 

- Advertisment -