Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Subscribe

कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणीशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिम्मत तुम्ही दाखवणार का? राहुल गांधींच्या थोबाडात देणार का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला.

कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणीशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिम्मत तुम्ही दाखवणार का? राहुल गांधींच्या थोबाडात देणार का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला. तसेच, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवरही टीका केली. (Do you have the guts give slap to Rahul Gandhi CM Eknath Shinde question to Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सावरकर यांच्यावर होणारा अवमानाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. “सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य व्यतिरिक्त देखील अनेक क्षेत्रामध्ये मोलाचं काम केलंय. त्यांचं योगदान आहे. अंधश्रद्धा निर्मूलन असेल, मराठी भाषेचा गौरव असेल, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचं काम त्यांनी केले. कितीतरी क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्या योगदानाचा ऋणी आहे. ते फक्त महाराष्ट्राचे दैवत नाही तर संपूर्ण देशाचे दैवत आहे. आणि अशा या दैवताचा अवमान वारंवार होत आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“आपण पाहिले की विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकही शब्द जे हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे नेते आहेत, त्यांनी एकही शब्द राहुल गांधींच्या विरोधात काढण्याची हिम्मत केली नाही. राहुल गांधीची खासदारकी कायद्याने, नियमाने, कोर्टाच्या निर्णयानुसार गेली. त्याचा बचाव करायला काळ्या फिती लावून या काँग्रेसच्या बरोबरीने साथ देणारे नेतेही आपण पाहिले. आणि हे देखील याठिकाणी दुर्दैव आणि ही वृत्ती देखील महाराष्ट्राने आणि देशाने पाहिली आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असे बोलणारे नेते विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गप्प होते. कशासाठी तर राजकारणासाठी. महाविकास आघाडीसाठी याच्यापेक्षा दुसरे काय दुर्दैव असू शकते. कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणीशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती. ही हिम्मत तुम्ही दाखवणार का? राहुल गांधींच्या थोबाडात देणार का हा माझा सवाल आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – सावरकरांनी ज्या तुरुंगात यातना भोगल्या त्या तुरुंगात राहुल गांधींनी एक दिवस जावे – मुख्यमंत्री शिंदे

- Advertisment -