IPL 2022, Wasim Jaffer : पंजाब किंग्जच्या फलंदाज प्रशिक्षक पदाचा वसिम जाफरने दिला राजीनामा

आयपीएलच्या मेगा ऑक्शनला सुरूवात झाली आहे. मात्र, पंजाब किंग्जच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पंजाब संघाचे फलंदाज प्रशिक्षक पदाचा वसिम जाफरने राजीनाम दिलाय. आपल्या राजीनाम्याबाबत जाफरनं ट्विटरवर घोषणा केली आहे. २०१९ पासून ते पंजाब किंग्ज संघाच्या अन्य सपोर्ट स्टाफसोबत काम करत होते. संघातून खेळाडूंना ते फलंदाजाचे धडे शिकवत असत. फलंदाजाच्या प्रशिक्षकाची धुरा त्यांनी २०१९ पासून सांभाळली.

जाफरने पंजाब किंग्जच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर त्याने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक मजेशीर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूरच्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटातील अच्छा चला हूँ, दुआओं में याद रखना या गाण्यातील फोटो पोस्ट करून त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. तसेच जाफरने ट्विटमध्ये माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि संपूर्ण टीमला आयपीएल २०२२ साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी पंजाब संघानं मयांक अग्रवालला १२ कोटी आणि अर्शदीप सिंहला ४ कोटीमध्ये रिटने केलंय. सध्या पंजाबच्या संघाकडे ७२ कोटी शिल्लक आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात एकूण दहा संघ ऐकमेकांशी भिडणार आहेत.

२००८ च्या हंगामात वसिम जाफ आरबीसीकडून खेळले होते. आयपीएल च्या सहा सामन्यांमध्ये त्यांनी १९.१६ च्या सरासरीने एकूण ११५ धावा केल्या होत्या. सध्या आस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डॅमियन राईट गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पंजाबच्या संघाची जबाबदारी संभाळत आहेत.


हेही वाचा : UP Assembly Election 2022: दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांवर राजकीय पक्षांची अग्निपरीक्षा, भाजपासाठी तगडं आव्हान