घरAssembly Battle 2022UP Assembly Election 2022: दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांवर राजकीय पक्षांची अग्निपरीक्षा, भाजपासाठी...

UP Assembly Election 2022: दुसऱ्या टप्प्यातील ५५ जागांवर राजकीय पक्षांची अग्निपरीक्षा, भाजपासाठी तगडं आव्हान

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये काल(गुरूवार) पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणूक पार पाडली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत ६०.१७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. परंतु याआधीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला. आता सर्व पक्षांचं आणि लोकांचं लक्ष लागलंय ते म्हणजे निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याकडे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ५५ जागांवर पक्षांची अग्निपरीक्षा असणार आहे. या टप्प्यामध्ये राजकीय पक्षांची परीक्षा उत्तर प्रदेश आणि रूहेलखंड विभागाच्या मुस्लिम बेल्टवर असणार आहे. या टप्प्यांत काही जागा अशा आहेत, ज्यामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ४० ते ५० टक्के आहे. ९ जिल्ह्यांच्या ५५ जागांवर ५८६ उमेदवार रणांगणात उतरणार आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक १४ फेब्रुवारी रोजी सोमवारी होणार आहे. परंतु दुसरा टप्पा भाजपासाठी तगडं आव्हान ठरणार आहे.

कोणत्या जागांवर होणार मतदान?

दुसऱ्या टप्प्यातील ९ जिल्ह्यांमध्ये अमरोहा, हसनपूर, गुन्नौर, बिसौली, सहसवान, बिलसी, बदाऊन, शेखपूर, दातागंज, बहेरी, मीरगंज, भोजीपुरा, नवाबगंज, फरीदपूर, बिठारी चैनपूर, ओन्ला, कटरा, जलालाबादतिहार, पोवयान, मुरादाबाद शासक, मुरादाबाद, मुरादाबाद, चंदनगर, मुरादाबाद, नवाबगंज बिलारी, असमोली, संभल, सुआर, चमरुआ, बिलासपूर रामपूर, मिलक, धनेरा, नोगाव सदात, बेहत, नाकुर, सहारनपूर नगर,सहारनपूर, देवबंद, रामपूर मणिहरन, गंगोह, नजीबाबाद, नगीना, बरहापूर, धामपूर, नेहतौर, बिजनौर, चंदपूर, नूरपूर, कंठ, ठाकुरद्वारा, शाहजहानपूर आणि दादरोल विधानसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.

- Advertisement -

मुस्लिम मतदार ठरणार महत्त्वाचा भाग

ज्या विधानसभा मतदार संघातून उमेदवार लढत आहेत. त्यांच्याबाबतीत जाणून घेणं पक्षांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण ५५ जागांवर मुस्लिम मतदारांची संख्या आणि त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. मुस्लिम आणि जाट यांच्या व्यतिरिक्त लोधी आणि कुर्मी मतदार उमेदवारांसाठी भारी पडू शकतात. या मतदार संघात समाजवादी पक्षाचं अस्तित्व कायम आहे. २०१७ मध्ये सपाने काँग्रेस आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसपा-रालोद यांनी युती केली होती. त्यामुळे दोन्ही निवडणुकींत युती केलेल्या पक्षांना ५५ जागांवर मोठा फायदा झाला होता.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकुण ६२३ उमेदवार लढतीमध्ये सहभागी होते. त्यापैकी ७३ महिला उमेदवार होते. एकुण २.२७ मतदारांनी राज्यातील पश्चिमी भागातील ११ जिल्ह्यात एकुण ५८ विधानसभा जागांसाठी उमेदवारांचे भवितव्य हे ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले.

- Advertisement -

हेही वाचा : Amit Thackeray in Raigad: अमित ठाकरेंच्या हस्ते अलिबाग गड संपर्क कार्यालयाचे उदघाटन, मनसैनिकांमध्ये नवं चैतन्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -