Virat Kohli: दुबईच्या मादम तुसाद म्युझियममध्ये उभारला विराट कोहलीचा मेणाचा पुतळा

याआधी विराटचा लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडिअमवर पहिल्यांदा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला होता

wax statue of Virat Kohli erected at Madame Tussauds Museum in Dubai
Virat Kohli: दुबईच्या मादम तुसाद म्युझियममध्ये उभारला विराट कोहलीचा मेणाचा पुतळा

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन सर्वांचा लाडका विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दुबईच्या प्रसिद्ध अशा मादाम तुासाद म्युझियममध्ये विराट कोहलीचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. हुबेहुब विराट कोहलीसारखा पुतळा पाहून विराटचे फॅन्स हैराण झाले आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. याआधी विराटचा लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडिअमवर पहिल्यांदा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला होता. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा विराटच्या मेणाच्या पुतळ्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

दुबईच्या मादाम तुसाद या म्युझियमध्ये केवळ विराटच नाही तर इंग्लडची राणी, अमेरिकेची माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प,प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅंम, फुटबॉलर मेस्सी यांरख्या जवळपास ६० हून अधिक लोकांचे मेणाचे पुतळे तयार करण्यात आले आहेत.

आपण पाहिले तर सध्या भारतीय क्रिकेट टीम टी – २० सामन्यांसाठी दुबईमध्ये गेली आहे. दुबईमध्ये असतानाच विराटला हे छान सप्राईज मिळाले आहे. भारतीय टीम दुबईमध्ये टी-२० वर्ल्डकपची तयारी करत आहे. भारतीय टीमने वर्ल्डकपच्या तयारीत इंग्लंडविरुद्ध आपला पहिली वॉर्मअप मॅच खेळली आहे. टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया विरोधात आपला दुसरी वॉर्मअप मॅच खेळणार आहे.

दुसरी वॉर्मअप मॅच टीम इंडिया जिंकणार यावर फॅन्सचा पूर्णपणे विश्वास आहे. या मॅचमझध्ये रोहित शर्मा आणि वरुण चक्रवर्ती या खेळाडूंना देखील संधी मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्या सराव मॅचमध्ये भारताने इंग्लंडवर ७ विकेटने मात केली. भारताकडून ईशान किशनने यावेळी सर्वांत चांगली कामगिरी केली होती. ईशाननंतर राहुल अर्धशकत खेळला. २४ ऑक्टोबरपासून टीम इंडियाच्या स्पर्धेला सुरुवात होणार असून पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानसोबत खेळणार आहे.


हेही वाचा – मरून किकबॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंचे यश