घरक्रीडालग्न ठरलं! चहल- धनश्रीचा साखरपुडा झाला...फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

लग्न ठरलं! चहल- धनश्रीचा साखरपुडा झाला…फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Subscribe

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. YouTuber धनश्री वर्माबरोबर लवकरच तो लग्न करणार आहे. नुकताच चहलच्या घरी त्यांचा साखरपुडा पार पडला. धनश्री आणि चहलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिध्द यू- ट्युबरपैकी एक आहे. तिच्या यू-ट्युब चॅनलचे १.५ million फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला आहे. चहलची पत्नी धनश्री वर्मा डॉक्टर आणि कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तिने युजवेंद्रला डान्स शिकवतानाचे ही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

- Advertisement -

अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली असून तो लवकरच आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल. युजवेंद्रने २०१६मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं. आत्तापर्यंत त्याने ५२ वन डे आणि ४२ ट्वेंटी २० सामन्यात अनुक्रमे ९१ आणि ५५ विकेट्स घेतल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -