घरक्रीडामहिला हॉकी विश्वचषक स्पर्धा २०१८ : भारत-इंग्लंड सामना बरोबरीत

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा २०१८ : भारत-इंग्लंड सामना बरोबरीत

Subscribe

इंग्लंडच्या लिली ओव्सलीने ५३ व्या मिनिटाला गाेल करत इंग्लडला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली आणि सामना १-१ अशा बरोबरीत सुटला.

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा २०१८ सध्या लंडनमध्ये सुरु अाहे. विश्वचषकाच्या ‘बी’ गटातील पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघानी इंग्लडला १-१ असे बरोबरीत रोखले. पहिल्याच सामन्यात भारताला विजय मिळवण्याची संधी होती खरी मात्र मिळलेली १-० आघाडी भारतीय संघाला कायम न राखता आल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. ५३ व्या मिनिटात इंग्लंडच्या लिली ओव्सलीने दमदार खेळी करत इंग्लडला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली.

यजमान असलेल्या इंग्लड संघाने घरच्या मैदानावर पहिल्या मिनीटापासूनच आक्रमक खेळ केला. काही मिनिटांचं या आक्रमक खेळाचा इंग्लड संघाला फायदा होत पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली . मात्र गोलकिपर सविताने बचाव करत इंग्लंडचे आघाडी घेण्याची संधी परतावून लावली. या धक्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळाला सुरुवात केली. भारताच्या खेळाडूंनी बचावत्मक खेळ करत इंग्लंडच्या खेळाडूंना गोल करण्याच्या संधी दिल्या नाहीत. त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघाना बढत घेता आली नाही.

- Advertisement -

दुसर्‍या सत्रात भारतीय महिलांनीही आक्रमक खेळ सुरु ठेवला. इंग्लंडच्या बचावफळीने सुदंर खेळ करत भारताला आघाडी मिळू दिली नाही. दुसर्‍या सत्रात इंग्लंडच्या संघाला पेनल्टी स्ट्रोक संधी मिळाली होती. मात्र रेफ्रींच्या या निर्णयाला तिसर्‍या पंचांकडे आव्हान देण्यात आले. तिसर्‍या पंचांनी दिलेला निर्णय भारताच्या बाजूने लागल्यामुळे इंग्लंडची दुसरी पेनल्टी स्टोकची आयती संधी हातातून निघून गेली. यानंतर इंग्लंडच्या अनेक गोल करण्याचे अनेक प्रयेत्न केले. मात्र भारताची गोलकिपर सविताने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. २५ व्या मिनीटाला नेहा गोयलने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत भारतीय महिला संघ १-० अशी बढत कायम ठेवण्यात यशश्वी ठरला.

चौथ्या सत्रात दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांच्या गोलपोस्टवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतालाही अखेरच्या सत्रात मात्र दोन्ही संघाच्या गोलकिपरने तितकाच चांगला बचाव केला. अखेर ५३ व्या मिनीटाला इंग्लंडच्या ओव्सलीने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन इंग्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्हा संघांनाही सामन्यात एकही गोल करता न आल्याने सामना १-१ अशा बरोबरीत सुटला. तर दुसरीकडे जर्मनीने दक्षिण आफ्रिकेवर ३-१ ने, ऑस्ट्रेलियाने जपानवर ३-२ ने आणि आयर्लंडने अमेरिकेवर ३-१ ने विजय मिळवला आहे. यानंतरचा भारताचा पुढील सामना गुरुवारी आयर्लंड होणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -