घरक्रीडाविश्वचषकात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना रंगू शकतो

विश्वचषकात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना रंगू शकतो

Subscribe

भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी जमते. याशिवाय दोन्ही देशांच्या घरोघरी, चौकाचौैकांवर टीव्हीमार्फत हा सामना बघितला जातो. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना झाला असून त्यामध्ये भारताने बाजी मारली. मात्र, पाकिस्तानचा उपांत्य फेरीसाठी मार्ग मोकळा झाला तर भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा रंगू शकतो.

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी बांग्लादेशच्या संघाचा पराभव करुन उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. यासोबतच गुणतालिकेत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला असता तर त्याचा थेट फायदा पाकिस्तानला झाला असता. इंग्लंडच्या पराभवामुळे गुणतालिकेत इंग्लंडचे स्थान खाली आणि पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र, इंग्लंडने भारताचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला. तरीही पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही धगधगत्या आहेत. कारण पाकिस्तानचा बांग्लादेश सोबतचा एक सामना अजूनही शिल्लक आहे.

पाकिस्तानला अजूनही संधी

पाकिस्तानला उपांत्य फेरी इतक्या सहजासहज गाठता येऊ शकत नसली तरीही इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना कदाचित पाकिस्तानसाठी वरदान ठरु शकतो. कारण न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला तर पाकिस्तानला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारत, तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड, चौथ्या क्रमांकावर इंग्लंड तर पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोघांचा एक सामना शिल्लक आहे. न्यूझीलंडला ११ गुण आणि इग्लंडला १० गुण आहेत. तर पाकिस्तानला ९ गुण आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला आणि पाकिस्तानने बांग्लादेश सोबतच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव केला तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाता येऊ शकणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा रंगू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा – पाकची संधी हुकली?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -