घरक्रीडाWTC : 'या' भारतीय गोलंदाजाच्या खात्यात असू शकतील सर्वाधिक विकेट

WTC : ‘या’ भारतीय गोलंदाजाच्या खात्यात असू शकतील सर्वाधिक विकेट

Subscribe

सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्स सध्या अव्वल स्थानावर आहे. 

भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेने भारताच्या या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार असून या सामन्याला १८ जूनपासून सुरुवात होईल. भारतीय संघाने अंतिम फेरी गाठण्यामध्ये ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने महत्वाची भूमिका बजावली आहे. अश्विनच्या खात्यात सध्या १३ सामन्यांमध्ये ६७ विकेट आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अव्वल स्थानी असून त्याने १४ सामन्यांमध्ये ७० विकेट घेतल्या आहेत. मात्र, अंतिम सामन्यात चार विकेट घेत अश्विन कमिन्सला मागे टाकू शकेल.

चार विकेट घेणे गरजेचे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार असल्याने अश्विनला भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळणारच याची शाश्वती नाही. परंतु, संधी मिळाल्यास या सामन्यात चार विकेट घेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावण्याचे अश्विनचे लक्ष्य असेल. न्यूझीलंडच्या टीम साऊथीने १० सामन्यांमध्ये ५१ विकेट घेतल्या असून त्याला अव्वल स्थान मिळवण्यासाठी २० विकेट घ्याव्या लागतील.

- Advertisement -

६७ पैकी ५२ विकेट भारतात 

अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत चार वेळा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने १३ पैकी ९ कसोटी सामने भारतामध्ये, तीन सामने ऑस्ट्रेलियात आणि एक सामना न्यूझीलंडमध्ये खेळला आहे. त्याने घरच्या मैदानावर खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली असून ९ सामन्यांमध्ये तब्बल ५२ बळी घेतले आहेत. तसेच या ५२ पैकी ३२ विकेट त्याने यावर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत घेतल्या होत्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -