घरक्रीडाWorld U-20 Athletics : भारताच्या अमित खत्रीची १० किमी चालण्याच्या शर्यतीत 'रौप्य'...

World U-20 Athletics : भारताच्या अमित खत्रीची १० किमी चालण्याच्या शर्यतीत ‘रौप्य’ कमाई

Subscribe

खत्रीने रौप्यपदक जिंकताना ४२ मिनिटे १७.९४ सेकंदात ही शर्यत पूर्ण केले. 

भारताचे खेळाडू केनियामध्ये सुरु असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद (World U-20 Athletics) स्पर्धेत चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताच्या ४x४०० मिश्र रिले संघाने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर शनिवारी भारताच्या अमित खत्रीने १० किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत यजमान केनियाच्या हेरिस्टन वॉनयोनीने ४२ मिनिटे १०.८४ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तर अमित खत्रीने रौप्यपदक जिंकताना ४२ मिनिटे १७.९४ सेकंदात ही शर्यत पूर्ण केले.

सर्वोत्तम वैयक्तिक वेळेची नोंद

१० किमी चालण्याच्या या शर्यतीदरम्यान खत्री बराच काळ अव्वल क्रमांकावर होता. मात्र, वॉनयोनीने अखेरच्या दोन लॅप शिल्लक असताना खत्रीला मागे सोडत अव्वल क्रमांक मिळवला. त्याने ही आघाडी अखेरपर्यंत राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्पेनच्या पॉल मॅकग्राने ४२ मिनिटे २६.११ सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक पटकावले. सुवर्णपदक जिंकणारा वॉनयोनी आणि रौप्यपदक जिंकणारा खत्री यांनी सर्वोत्तम वैयक्तिक वेळेची नोंद केली.

- Advertisement -

भारताची विक्रमी कामगिरी 

या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या ४x४०० मिश्र रिले संघाने कांस्यपदक पटकावले होते. तर शनिवारी खत्रीने १० किमी चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले. एका २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदके जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ ठरली. तसेच या स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे सहावे पदक ठरले.


हेही वाचा – World U-20 Athletics : भारताच्या मिश्र रिले संघाला कांस्यपदक

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -