Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा WTC Final : पुजारावर टीका कशासाठी? तो टीकाकारांपेक्षा जास्त क्रिकेट खेळलाय; सचिन भडकला

WTC Final : पुजारावर टीका कशासाठी? तो टीकाकारांपेक्षा जास्त क्रिकेट खेळलाय; सचिन भडकला

काही लोक पुजारा वेगाने धावा करत नसल्याने त्याच्यावर टीका करतात.

Related Story

- Advertisement -

भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराची सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमधील सार्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. पुजारा त्याच्या सावध आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, खेळपट्टीवर टिकून राहण्याच्या प्रयत्नात त्याला धावफलक हलता ठेवण्यात अपयश येते आणि तो बरेच चेंडू खेळून काढत असल्याची त्याच्यावर वारंवार टीका होते. परंतु, पुजारावर टीका करणाऱ्यांना त्याच्याइतका आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसून त्यांना त्याचे भारतीय संघाला असलेले महत्त्व कळत नाही, असे म्हणत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पुजाराच्या टीकाकारांना फटकारले आहे.

भारतीय संघाचा खूप महत्त्वाचा सदस्य

कसोटी क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटला फार महत्त्व देऊन चालत नाही. कसोटी संघात तुम्हाला विविध पद्धतीच्या आणि शैली असलेल्या खेळाडूंची गरज असते. आपल्या हाताची पाचही बोटे सारखी नसतात. त्याचप्रमाणे कसोटी संघात प्रत्येक खेळाडूची वेगळी भूमिका असते. पुजारा हा भारतीय संघाचा खूप महत्त्वाचा सदस्य आहे. त्याच्या प्रत्येक खेळीवर टीका कशासाठी होते? त्यापेक्षा त्याने भारतासाठी केलेल्या कामगिरीचे कौतुक करणे जास्त योग्य ठरेल, असे सचिन म्हणाला.

टी-२० क्रिकेटमुळे लोकांचा दृष्टिकोन बदलला

- Advertisement -

काही लोक पुजारा वेगाने धावा करत नसल्याने त्याच्यावर टीका करतात. परंतु, पुजारावर टीका करणाऱ्यांना त्याच्याइतका आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. या टीकाकारांना त्याचे भारतीय संघाला असलेले महत्त्व कळत नाही, असे सचिनने नमूद केले. तसेच टी-२० क्रिकेटमुळे आता लोकांचा फलंदाजीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे सचिनला वाटते. फटकेबाजी करणारा आणि चेंडू सीमारेषेबाहेर मारणारा फलंदाज हा कसोटीत यशस्वी होईल याची खात्री नसते, असे म्हणत सचिनने पुजाराची पाठराखण केली.

- Advertisement -