VIDEO: जीवाने घेतला क्रिकेटर ऋषभ पंतचा हिंदी क्लास

या व्हिडिओमध्ये जीवा ऋषभ पंतला हिंदी वर्णमाला शिकवताना दिसतेय. या व्हिडिओने सगळ्याच चाहच्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

महेंद्र सिंग धोनीची मुलगी जीवा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. जीवा ही भारतीय संघातील खेळाडूंच्या मुलांपैकी सर्वात जास्त सोशल मीडियावर फॉलोर्स असणारी एकमेव मुलगी आहे. सोशल मीडियावर जीवाचे नेहमी अॅक्टीव असून तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो आणि व्हिडिओ बघायला मिळतात. नुकताच सोशल मीडियावर क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचा जीवाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जीवा ऋषभ पंतला हिंदी वर्णमाला शिकवताना दिसतेय. या व्हिडिओने सगळ्याच चाहच्यांचे लक्ष वेधून घेतलय.

 

View this post on Instagram

 

Back to Basics !

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni) on

दिल्ली कॅपिटलचा खेळाडू ऋषभने आयपीएल २०१९ च्या सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. मात्र, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाल्यानंतर त्याचा संघ फायनलमध्ये पोहचू शकली नाही. म्हणून महेंद्र सिंग धोनी त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यावेळी पंत जीवासोबत डिनरच्यावेळी भेट झाली. तेव्हा जीवाशी मैत्री होताच तिने ऋषभला वर्णमाला शिकवण्यास सुरवात केली. याचा व्हिडिओ ऑफिशिअल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांकडून १० लाखांहून अधिक लाईक मिळाले.

जीवाच्या इंस्टाग्रामवर आतापर्यंत १३३ फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. तिचे फॅन फॉलोइंगही खूप असल्याचे तिच्या अकाऊंटवर दिसते. जीवाला इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक चाहते फॉलो करत असून तिच्या अकाऊंटवर फक्त ८९ लोकांना फॉलो केले आहे.