घरटेक-वेकसर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Oppo A53s भारतात लाँच

सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Oppo A53s भारतात लाँच

Subscribe

स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने भारतीयांसाठी स्वस्तातला 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. ओप्पोने Oppo A53s 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून 5000 mAh ची बॅटरी आहे. ओप्पोचा हा फोन नुकताच लाँच झालेला Realme 8 5G सोबत स्पर्धा करेल असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ही १४ हजार ९९९ रुपये आहे.

Oppo A53s 5G स्मार्टफोनला ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या रिफ्रेश रेट 60 hrtz आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार फोन अँड्रॉयड Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर काम करतो. चांगल्या परफॉर्मंससाठी MediaTek Dimensity 700 SoC सॉफ्टवेअर देण्यात आलं आहे. याशिवाय, या फोनमध्ये ट्रिपल कॅमरा सेटअप देण्यात आलं आहे. 13MP प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मायक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९० रुपये आहे. तर 8GB + 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये आहे.

- Advertisement -

OPPO A53s स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्स – MediaTek Dimensity 700
डिस्प्ले – 6.52 inches (16.56 cm)
स्टोरेज – 128 GB
कॅमेरा  – 13 MP + 2 MP + 2 MP
बॅटरी – 5000 mAh
रॅम – 6 GB

 

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -