घरटेक-वेकमोबाइल युजर्ससाठी बॅड न्यूज, रिचार्जसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार

मोबाइल युजर्ससाठी बॅड न्यूज, रिचार्जसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार

Subscribe

मोबाइल युजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मोबाइल युजर्सना लवकरच रिचार्जसाठी खिशाला कात्री लागणार असून रिचार्जसाठी दुप्पट पैसे द्यावी लागणार आहे. याबाबत भारती एअरटेलचे फाउंडर आणि चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी आगामी टॅरिफ महाग केला जाण्याचे संकेत दिले आहेत. तसेच ते म्हणाले की, ‘युजर्सना रिचार्जसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते. सध्या जर युजर्स रिचार्जसाठी महिन्यांला ४५ रुपये देत असेल तर त्याला लवकरच १०० रुपये द्यावे लागणार आहे.’

मित्तल यांनी पुढे सांगितले की, ‘युएस किंवा युरोपसारखे ५० किंवा ६० डॉलर आम्हाला नाही पाहिजे. पण १६० रुपयांमध्ये १.६ जीबी डेटा महिन्यांला देणे जास्त दिवस चालणारे नाही आहे. या किंमतीत युजर्सला किंवा १.६ जीबी डेटा मिळायला हवे किंवा डेटाची किंमत वाढवावी लागेल. याचा सरळ अर्थ असा आहे की, १० रुपयात मिळणाऱ्या १ जीबी डेटासाठी १०० रुपये आता मोजावे लागणार आहे.’

- Advertisement -

सध्या २४ दिवसांसाठी एअरटेल १९९ रुपयात रोज १ जीबी डेटा ऑफर करीत आहे. डेटा बेनिफिट्स १० पट कमी होऊन येणाऱ्या काळात २.४ जीबी होईल. तर मिनिमम रिचार्जची महिना किंमत कमीत कमी १०० रुपये होईल. एअरटेलच्या बेस प्लॅनची किंमत सध्या ४५ रुपये आहे.

‘३०० रुपयांची एव्हरेज रिवेन्यूवर युजर (ARPU)ची गरज इंडस्ट्रीला स्थिर बनवण्यासाठी आहे. आम्ही पुढील सहा महिन्यांत २०० रुपये स्तराला निश्चित करण्यासाठी पोहोचू. तसेच २५० रुपये एआरपीयू असेल’, असे मित्तल म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ट्रायच्या नोटीसमुळे Vodafone Ideaची वाढली समस्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -