घरटेक-वेकआता Instagramवर फेक अकाउंटना लागणार लगाम ; नव्या यूजर्सला सबमिट करावा लागणार...

आता Instagramवर फेक अकाउंटना लागणार लगाम ; नव्या यूजर्सला सबमिट करावा लागणार व्हिडीओ सेल्फी 

Subscribe

फेसबुक म्हणजेच आत्ताचे मेटा याच्या मालकीच्या इंस्टाग्रामने एक व्हिडिओ सेल्फी आर्मी लाँच केली आहे. कंपनीच्या या नवीन अपडेटमुळे फेक अकाउंट्सवर आळा बसणार आहे. ही बाब सर्वप्रथम सोशल मीडिया सल्लागार मॅट नवरा यांनी लक्षात घेतली आहे. इन्स्टाग्रामवरील बनावट अकाऊंटची संख्या कमी करण्यासाठी हे अपडेट करण्यात आले आहेत. कोणताही बायोमेट्रिक डेटा गोळा करणार नाही. हे नवीन फिचर फक्त वेरिफिकेशनसाठी वापरले जाईल,असे मॅट  नवरा यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

जेव्हा एखादा नवीन वापरकर्ता Instagram प्लॅटफॉर्मवर खाते तयार करतो तेव्हा Instagram चे नवीन फिचर आपले काम करेल. यासाठी त्या संबंधित वापरकर्त्यांना व्हिडिओ सेल्फी प्रक्रियेतून जावे लागेल. पूर्वी ही अशी प्रक्रिया यूजर्ससाठी नव्हती. कंपनी वापरकर्त्यांना ते खरे असल्याची खात्री करण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने डोके फिरवतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगत आहे. मॅट नवराने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवरील वर्णनात असे म्हटले आहे की, आम्हाला तुम्ही तुमचे डोके वेगवेगळ्या दिशेने हलवतानाचा एक शॉट व्हिडिओ पाठवा जेणेकरुन, आम्हाला तुम्ही खरी व्यक्ती आहात हे समजण्यासाठी आणि तुमची ओळख पटण्यासाठी मदत होईल. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर, वापरकर्त्यांना ते सबमिट करावे लागेल.

कंपनीचे म्हणणे आहे की हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर कधीही दिसणार नाही. ३० दिवसांच्या आत तुमच्या सर्व्हरवरून तो व्हिडिओ काढला जाईल. हे सेल्फी व्हिडिओ चेहऱ्याच्या ओळखीसाठी वापरले जाणार नाहीत आणि कोणताही बायोमेट्रिक डेटा संकलित करणार नाही, असे आश्वासन मेटा यांनी दिले आहेत. हे नवीन फीचर केवळ इंस्टाग्रामवर नवे अकाउंट तयार करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी लागू केले जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – राज्यात पुढील तीन तासांत कोसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -