Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक KYC वेरिफिकेशनच्या नावे येणाऱ्या SMS पासून रहा सावध

KYC वेरिफिकेशनच्या नावे येणाऱ्या SMS पासून रहा सावध

अज्ञात क्रमांकावरुन कंपनी मेसेज पाठवत नाही

Related Story

- Advertisement -

सध्या डिजीटलच्या युगात ऑनलाईन चोरी किंवा ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विविध प्रकारच्या ट्रिक वापरून ऑनलाईन ठग स्कॅम करत आहेत. हे स्कॅमर्स युजर्सच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कंम्प्युटरमधील प्रायव्हेट डेटा ऑनलाईन चोरी करत फसवणुक करण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे पोलिसांसमोरही ऑनलाईन गुन्हेगारी रोखणे एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. यातच आणखी एक नवा स्कॅम समोर येत आहे.

तुम्हालाही अशा प्रकारचे मेसेज येत असतील तर रहा सावध

यात ऑनलाईन ठग KYC वेरिफिकेशनच्या नावे युजर्सचा पर्सनल डेटा चोरी करत आहेत. युजर्सच्या मोबाईल नंबरवर KYC वेरिफिकेशनच्या नावे एक अनोळखी नंबर वरून मेसेज (SMS) पाठवला जात आहे. जर आपण युजर्सने आलेल्या मेसेजवर क्लिक करुन वेरिफिकेशन पूर्ण न केल्यास त्यांचा मोबाईल नंबर बंद होईल असे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे. तसेच हे वेरिफिकेशन ४८ तासांच्या आता करणे गरजेचे असल्याचे त्यात म्हटले आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारचे मेसेज येत असतील तर सावध रहा, कारण हे मेसेज बनावट असून यातून युजर्सची ऑनलाईन फसवणूक केली जात आहे.

अज्ञात क्रमांकावरुन कंपनी मेसेज पाठवत नाही

- Advertisement -

कारण कोणतीही सिमकार्ड कंपनी वेरिफिकेशनसाठी कस्टमर्सशी थेट कॉन्टॅक्ट करत बोलते किंवा आपल्या अधिकृत वेबसाईट किंवा चॅनेलवरून त्या संदर्भात अपडेट देत असते. यासाठी तुम्हाला कंपनीकडून मेसेज किंवा कॉल येईल, परंतु अशा कोणत्याही अज्ञात क्रमांकावरुन कंपनी मेसेज पाठवत नाही. Airtel या Vi कंपनी आपल्या मेसेजमध्ये number ला कधी number लिहित नाही. कधीकधी तर Airtel कंपनीचे मेसेज स्कॅमर्स Jio च्या युजर्सला पाठवतात.

‘असे’ मेसेज येत असतील तर दुर्लक्ष करा

Airtel कंपनीने आपल्या वापरकर्त्यांना या Fraud Alert संदर्भात अधिकृत मेसेज पाठवत अलर्ट केले की, Airtel कधीही आपणास eKYC details/ Aadhaar number शेअर करण्यास सांगत नाही. किंवा या संदर्भात कंपनी वापरकर्त्यांना कोणतेही अॅप डाउनलोड करण्यास किंवा कोणत्याही अज्ञात मोबाईल नंबरवरून येणाऱ्या मेसेजवरून वेरिफिकेशन करण्यास सांगत नाही. त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर दुर्लक्ष करा अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच या मेसेजमध्ये दिल्या जाणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका अन्यथा तुमच्या मोबाईलमधील पर्सनल डेटा स्कॅमर्स चोरी करु शकतात.


कोरोनामुळे राज्यातील २ लाख ५६ हजार विडी कामगारांवर उपासमारीची वेळ


- Advertisement -

 

- Advertisement -