केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मोबाईल फोन महागणार

Mobile phones to become costlier as government imposes 10% duty on import of display: Industry body
केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे मोबाईल फोन महागणार

केंद्राच्या एका निर्णयामुळे येत्या काळात मोबाईल फोन दर वाढवले जाऊ शकतात. वास्तविक, केंद्र सरकारने डिस्प्लेच्या आयातीवर १० टक्के शुल्क लादला आहे. याबाबत इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए)ने माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल फोनचे दर तीन टक्क्यांनी वाढू शकतात, असे आयसीईएने सांगितले आहे.

आयसीईएचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी सांगितले की, ‘केंद्राच्या या निर्णयामुळे मोबाईल फोनच्या किंमतीत दीड ते तीन टक्क्यांनी वाढतील. कोरोनाच्या काळात एनजीटीच्या रोखमुळे या उद्योगात डिस्प्ले असेंब्लीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवता आला नाही. यामुळे उद्योग अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकला नाही. आता आमचे लक्ष फक्त आयतीवर अवलंबून नाही तर जागतिक बाजारात मोठा वाटा मिळवण्यावर आहे.’

१ ऑक्टोबरपासून डिस्प्ले असेंब्ली आणि टच पॅनल वर हा शुल्क लावण्याचा प्रस्ताव होता. माहितीसाठी, आयसीईएच्या सदस्यांमध्ये, Apple, शिओमी, व्हिवो, विंस्ट्रॉन सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

दरम्यान २०१६मध्ये जाहीर केलेल्या टप्प्याटप्प्याने मॅन्युफॅक्चरिंग प्रोगाम (पीएमपी) अंतर्गत, उद्योगाबरोबर करारनामा ठेवण्याचा प्रस्ताव होता. पीएमपीचा उद्देश घटकांच्या देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहित करणे आणि त्यानंतर त्यांच्या आयातीला निरुत्साहित करणे आहे.


हेही वाचा – इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी Tesla भारतात येणार; जाणून घ्या खास गोष्टी