घरटेक-वेकमोटोचे 'हे' फोन होणार आज लाँच

मोटोचे ‘हे’ फोन होणार आज लाँच

Subscribe

मोटोरोला कंपनी आज त्यांचे दोन नवे कोरे फोन लाँच करणार आहे. दिल्लीत हे दोन फोन लाँच होणार असून ‘मोटो जी ६’ आणि ‘मोटो जी ६’ प्ले अशी या स्मार्टफोन्सची नावे आहेत. खिशाला परवडणाऱ्या दरात हे स्मार्टफोन्स मिळणार असल्याचा दावा मोटोरोला कंपनीकडून करण्यात आला आहे.

जी ६ ची नवी सीरिज

- Advertisement -

सध्या अनेक कंपन्या स्मार्ट फोन्सच्या स्पर्धेमध्ये आहेत. उत्तम कॅमेरा क्वालिटी, बॅटरी लाईफ आणि युजर फ्रेंडली फीचर, लुक्स या सगळ्या गोष्टी असलेल्या फोन्सना अधिक पसंती मिळते. त्यामुळे मोटोरोलाला स्पर्धेत टिकण्यासाठी एक चांगला फोन लाँच करायचा होता. गेल्या वर्षी मोटोरोला कंपनीने जी ५ ची सीरीज लाँच केली होती आणि आता मोटोरोला भारतात जी ६ फोन्ससह सज्ज झाला आहे. जी ६ आणि जी ६ प्लस हे फोन नेमके कसे असणार? या बद्दलची उत्सुकता आज अखेर संपणार आहे.

‘असे’ आहेत मोटोचे नवे फोन

- Advertisement -
  • मोटो जी ६ 

डिस्प्ले – ५.७० इंच

प्रोसेसर – १.८ GZ ऑक्टा-कोअर

फ्रंट कॅमेरा – ८ मेगापिक्सल

रेअर कॅमेरा – १३ मेगापिक्सल

रॅम – ३ जीबी/ ४ जीबी

स्टोरेज – ३२ जीबी/ ६४ जीबी

बॅटरी–  ४००० mAh

ओएस – अॅन्ड्राईड ८ ओरिओ

 

  • मोटो जी ६ प्ले

डिस्प्ले – ५.७० इंच

प्रोसेसर – १.४ ऑक्टा – कोअर

फ्रंट कॅमेरा – ८ मेगापिक्सल

रेअर कॅमेरा – १३ मेगापिक्सल

रॅम – ३ जीबी

स्टोरेज – १६ जीबी

बॅटरी – ४००० mAh

ओएस – अॅन्ड्राईड ८ ओरिओ

 

फोनचे लाँचिग बघा लाईव्ह

मोटोरोला चाहत्यांना या फोनच्या लाँचिंगचा सोहळा लाईव्ह बघता येणार आहे. युटयुबर  कंपनीने लाईव्ह स्ट्रीमिंग ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -