घरटेक-वेक६ ऑक्टोबर रोजी Nokia चा मेगा इव्हेंट! Nokia G50 5G सह 'हे'...

६ ऑक्टोबर रोजी Nokia चा मेगा इव्हेंट! Nokia G50 5G सह ‘हे’ स्मार्टफोन होणार लाँच

Subscribe

एचएमडी ग्लोबलने मेगा इव्हेंटची तारीख नुकतीच जाहीर केली असून हा मेगा इव्हेंट ६ऑक्टोबर रोजी होणार आहे. नोकियाच्या या मेगा इव्हेंटमध्ये नोकिया G50 5G सह अनेक चांगले स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. या इव्हेंटमध्ये आगामी स्मार्टफोनचे नाव नोकियाने जाहीर केले आहे. नोकिया G50 5G व्यतिरिक्त, कंपनी Nokia T20 अँड्रॉइड टॅबलेट लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने ट्विटरवरून लॉन्च इव्हेंटची घोषणा केली आहे. यामध्ये नोकिया G50 हा 5G स्मार्टफोन असेल असे सांगितले जात आहे. जो Qualcomm Snapdragon 480 चिपसेट सपोर्टसह देऊ शकतो. यासह नोकिया कडून Noki X20, Nokia X10 आणि Nokia XR20 लॉन्च केले जातील असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

नोकियाच्या येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा HD + डिस्प्लेसह 4850mAh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. नोकिया G50 5G स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि मुख्य कॅमेरा म्हणून 48MP सपोर्ट दिला जाऊ शकतो. याशिवाय इतर दोन कॅमेऱ्यांना सपोर्टही असणार आहे.

तसेच नोकियाप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजेच नोकिया लवकरच अँड्रॉइड टॅबलेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. Nokia T20 टॅब्लेटच्या नावाने हे लाँच केले जाऊ शकते. याटॅबमध्ये 10.36-इंच स्क्रीनसह 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह देऊ केला जाऊ शकतो. Nokia T20 टॅबलेट २०१५ नंतर लाँच होणार आहे. Nokia N1 Slate या नावाने हा फोन प्रथम २०१५ साली लाँच करण्यात आला. युनिसॉक प्रोसेसरला टॅब्लेटमध्ये सपोर्ट करता येतो. तसेच, हा टॅब अँड्रॉइड ११ आधारित असणार आहे.


मी यावर लवकरच मात करेन; गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर रॉजर फेडररची प्रतिक्रिया

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -