घरटेक-वेकआता Twitter वरही मिळणार पॉडकास्ट ऑप्शन, लवकरच लाँच होणार नवं फिचर

आता Twitter वरही मिळणार पॉडकास्ट ऑप्शन, लवकरच लाँच होणार नवं फिचर

Subscribe

रिवर्स इंजीनियर जेन मांचुन वांग यांनी हे फिचर स्पॉट केले आहे. त्यांनी याचा एक स्क्रिनशॉर्ट देखील शेअर केला आहे. त्याच्या स्क्रिनशॉर्टनुसार, ट्विटरच्या अँपमध्ये बॉटम मेन्यूमध्ये एक मायक्रोफोन आयकॉन दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर पॉडकास्टचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. ट्विट देखील त्याच्या युझर्सना हे फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ट्विटरचा लाइव्ह ऑडिओ प्रोडक्ट Spaces मागच्या दोन वर्षांपासून चांगलाच लोकप्रिय झाला आहे. हे पाहता आता कंपनीने आणखी एक ऑडिओ फिचर लाँच करण्याची योजना आखली आहे.

रिवर्स इंजीनियर जेन मांचुन वांग यांनी हे फिचर स्पॉट केले आहे. त्यांनी याचा एक स्क्रिनशॉर्ट देखील शेअर केला आहे. त्याच्या स्क्रिनशॉर्टनुसार, ट्विटरच्या अँपमध्ये बॉटम मेन्यूमध्ये एक मायक्रोफोन आयकॉन दिसत आहे. या आयकॉनवर टॅप केल्यानंतर युझर्स पॉडकास्ट्स पेजवर रीडायरेक्ट केले जाणार आहे. असे असले तरी हे नवीन फिचर कसे काम करेल ? याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सर्व युझर्ससाठी हे पॉडकास्ट टॅब उपलब्ध होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.

- Advertisement -

ट्विटरने २०२० साली क्लबहाऊस ऑडिओ अँपच्या धर्तीवर स्पेप फीचर आणले होते. हे फिचर्स युझर्सना आवडले देखील होते. मात्र सोशल पॉडकास्ट प्लॅटफॉर्म ब्रेकरने कंपनी विकत घेतल्यानंतर त्याच्या ऑडिओ सेवांमध्ये काही बदल करण्यात आले.

काही दिवसांआधी ट्विटने स्पेस फिचरचे नवे अपडेट आणले होते. या अपडेट नंतर मोबाईल यूझर्स चॅटरुम तयार करुन तिथे रेकॉर्डिंग करु शकत होते. अशा प्रकारे स्पेस सेशनमध्ये रेकॉर्ड करुन पॉडकास्टप्रमाणे शेअर केले जाऊ शकते. ही रेकॉर्डिंग ३० दिवसांपर्यंत अँक्टिव्ह राहू शकते. परंतु आता स्वतंत्र पॉडकास्ट फिचरमुळे ट्विटर स्पॉटिफाइ किंवा अँपल पॉडकास्टला टक्कर देऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – Apple ने लाँच केला 128 GB RAM चा Mac Studio; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -