घरताज्या घडामोडीमुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; परप्रांतीय मजुरांसह २० जण जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; परप्रांतीय मजुरांसह २० जण जखमी

Subscribe

चांदवड तालुक्यातील राहुड घाटातील घटना

चांदवड शहराजवळील राहुड घाटात परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणार्‍या दोन ट्रक, आयशर व कार यांच्यात सोमवारी (दि.११) सकाळी आठ वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. कारचा वेग कमी झाल्याने आयशर पाठोपाठ ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात सातजण गंभीर जखमी झाले असून १३ जण जखमी झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय कामगार घरी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. मुंबई येथून परप्रांतीय कामगार कुटुंबियांसह वाहनांनी, तसेच पायी मुंबई-आग्रा महामार्गावरुन आपल्या गावी परतत आहेत. सोमवारी सकाळी दोन ट्रकमधून कामगार मुंबई-आग्रा महामार्गावरुन जात होते. ट्रक चांदवड जवळील राहुड घाटात आले असता ट्रकच्या समोरील कारने अचानक वेग कमी केला. त्यामुळे कारवर आयशर पाठोपाठ ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात सातजण गंभीर जखमी असून सुमारे १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना १०८ रुग्णवाहिका व सोमा टोलच्या रुग्णवाहिकेने चांदवड उपजिल्हा रुग्णालय व काहींना मालेगाव येथे नेण्यात आले. अपघातामुळे राहुड घाटात तीन ते चार किलोमीटपर्यंत वाहनांच्या वाहनांचा रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व चांदवड सोमा कंपनीच्या कर्मचार्‍यांनी मदतकार्य सुरु केले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाहनांच्या रांगा लागल्याने मदतकार्य करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -