घरटेक-वेकभारतात सॅमसंगचे Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोन लाँच

भारतात सॅमसंगचे Galaxy A52 आणि Galaxy A72 स्मार्टफोन लाँच

Subscribe

सॅमसंगने अलीकडेच आपले तीन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A52, Galaxy A52 5G
आणि Galaxy A72 ग्लोबली लाँच केले होते. आता यापैकी दोन फोन म्हणजेच सॅमसंग गॅलेक्सी ए 52 आणि गॅलेक्सी ए 72 भारतात लाँच केले गेले आहेत. सॅमसंगने Galaxy A52 चे 5G व्हेरिएंट भारतात लाँच केले आहेत. दोन्ही फोनला वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफसाठी IP67 सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. यामुळे हे फोन्स १ मीटर पाण्यात ३० मिनिटे चालू राहू शकतील. फोनची बॅटरी दोन दिवस टीकेल, असा दावा कंपनीने केला आहे. Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 मध्ये 90Hz च्या रीफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त डॉल्बी ऑडिओ देखील सपोर्टेड आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A52, गॅलेक्सी A72 किंमत

Samsung Galaxy A52 ची 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत २६,४९९ रुपये आहे. 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत २७,९०० रुपये आहे. 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये एवढी आहे. काळा, निळा, सफेद, जांभळा आणि पिवळा रंगामध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

- Advertisement -

सॅमसंग गॅलेक्सी A52 स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी A52 ने अँड्रॉइड 11 बेस्ड One UI 3.1 दिला आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. याशिवाय यामध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंतचा स्टोरेज असून मेमरी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

फोनच्या कॅमेर्‍याविषयी सांगायचे तर यात चार रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये मुख्य लेन्स 64MP आहे, ज्यामध्ये अपर्चर एफ / 1.8 आहे. दुसरी लेन्स 12MP अल्ट्रा वाइड, तिसरी लेन्स 5MP डेप्थ आणि चौथी लेन्स मॅक्रो 5MPची आहे. सेल्फीसाठी यात 32MPचा कॅमेरा आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500 एमएएच बॅटरी आहे.

- Advertisement -

सॅमसंग गॅलेक्सी ए 72 स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये अँड्रॉइड 11 बेस्ड One UI 3.1 देखील आहे. याशिवाय यामध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इन्फिनिटी ओ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर, 8 GB रॅम, आणि 256GB पर्यंतचा स्टोरेज देखील आहे, जो मेमरी कार्डच्या मदतीने वाढविला जाईल.

या फोनमध्ये चार रियर कॅमेरे देखील आहेत ज्यात मुख्य लेन्स 64MP आहे, ज्याचे अपर्चर एफ / 1.8 आहे. दुसरी लेन्स 12MP अल्ट्रा वाइड, तिसरी लेन्स 5MP मॅक्रो आणि चौथी लेन्स 3 ऑप्टिकल झूमसह 8MP टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी यात 32MPचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस, टाइप-सी पोर्ट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. 25 वॅट फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -