घरटेक-वेकSBI ATM Card हरवलेल्या ग्राहकांची चिंता होणार दूर; घर बसल्या मिळवता येणार...

SBI ATM Card हरवलेल्या ग्राहकांची चिंता होणार दूर; घर बसल्या मिळवता येणार नवं कार्ड

Subscribe

कोरोना महामारीच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बँकांनी त्यांच्या बर्‍याच सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. देशातील सर्वात मोठी असणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानेही ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता डोअर स्टेप बँकिंग आणि ऑनलाइन बँकिंग सुविधांमध्ये वाढ केली आहे. अशातच तुम्ही एसबीआयचे ग्राहक असल्यास तुम्ही घरी बसून एसबीआयच्या बर्‍याच सुविधांचा लाभ घेऊ शकता. मात्र तुमचे एटीएम कार्ड हरवले असेल, कालबाह्य किंवा खराब झाले असेल तर यासाठी तुम्हाला बँक शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या फक्त नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज करून ते मिळवू शकतात.

असा करा SBI डेबिट ATM कार्डसाठी अर्ज

नवीन एटीएम कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या प्रक्रियेचा वापर करावा लागेल. यासाठी तुम्हाला मोबाइल नंबर तुमच्या बँक खात्यासह नोंदविला असला पाहिजे, कारण तुम्हाला ATM कार्डसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत या ओटीपीची आवश्यकता भासणार आहे.

- Advertisement -
  • सर्वप्रथम तुम्हाला इंटरनेट बँकिंगद्वारे बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल
    यानंतर ई-सेवांसह पर्यायावर भेट द्या. यानंतर तुम्हाला एटीएम कार्ड सर्व्हिसेसचा पर्याय निवडावा लागेल
  • हा पर्याय निवडल्यानंतर रिक्वेस्ट एटीएम / डेबिट कार्डचा पर्याय निवडावा लागेल.यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील, ते ओटीपीवर आधारित असतील. तुम्हाला ओटीपी पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर एक नवं पेज ओपन होईल त्यात कार्डचे नाव आणि कार्ड प्रकार तुम्हाला निवडावे लागतील. सर्व तपशील भरल्यानंतर, ते व्हेरिफाय करा आणि सबमिट करा.
  • सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज मिळेल त्यानुसार तुमचे डेबिट कार्ड ७ ते ८ दिवसांत घऱी डिलिव्हर करण्यात येईल
  • हे डेबिट कार्ड तुम्ही बँकेत नोंदणी केलेल्या पत्त्यावर येईल. जर तुम्हाला इतर कोणत्याही पत्त्यावर एटीएम कार्ड मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एसबीआयच्या शाखेत जाऊन भेट द्यावी लागणार आहे.

त्याचप्रमाणे एसबीआयनेही आपल्या ग्राहकांसाठी खात्यात नवीन मोबाइल नंबर अद्ययावत करण्याची सुविधा ऑनलाईन केली आहे. हे काम नेट बँकिंगद्वारे देखील करता येणार आहे.


7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! घरं खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत वाढणार नाही व्याजदर

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -