घरटेक-वेकTelegram New Features: आता व्हॉट्सॲप प्रमाणे टेलीग्रामवर करु शकतो ग्रुप व्हिडिओ कॉल

Telegram New Features: आता व्हॉट्सॲप प्रमाणे टेलीग्रामवर करु शकतो ग्रुप व्हिडिओ कॉल

Subscribe

टेलिग्रामने अनेक नविन फिचर्स ॲड केले आहेत. ज्यामध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलचा देखील समावेश आहे,

व्हॉट्स ॲप या प्रसिद्ध मॅसेजिंग ॲल्पिकेशनशी स्पर्धा करणारा मॅसेजिंग ॲप टेलीग्राम मध्ये आता व्हॉट्सॲप सारखे फिचर मिळणार आहेत. टेलिग्रामने अनेक नविन फिचर्स ॲड केले आहेत. ज्यामध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलचा देखील समावेश आहे. अॅड्रॉइड तसेच IOS वापरकर्ते टेलीग्रामच्या ग्रुप वॉइस चॅट यांना व्हिडिओ कॉलमध्ये बदलू शकतात. इततकेच नाही तर यामध्ये व्हॉट्सॲप पासून वेगळे नॉइज सप्रेशन आणि टॅबलेट सपोर्ट सारखे अप्रतिम फिचर्स देण्यात आले आहे.
किती लोकांना व्हिडिओ कॉल करु शकतात
टेलीग्राम यूजर्स आता स्क्रीन शेअर फिचर वापरुन मोबाइल स्क्रीनला सुद्धा शेअर करु शकताता. तसेच ग्रुप कॉलिंगसाठी मेंबर्सची संख्या 30 पर्यंत असणार आहे. तेसच पुढे हि संख्या वाढण्याची शक्याता आहे. या फिचरसाठी यूजर्संना डिजीकॅम आयकॉन वापरावा लागेल
कसा करणार वापर
टेलीग्रामने या नव्या फिचरचा वापर अॅड्रॉइड यूजर्स त्या ग्रुपच्या प्रोफाइलमध्ये करु शकतात ज्यात यूजर ॲडमिन आहे. IOS यूजर प्रोफाइलमध्ये राइट साइडवर एक वॉइस चॅट बटण दिला गेला आहे,टेलिग्रामने काही दुसरे नवीन फिचर्स त्यांच्या ॲपमध्ये ॲडकेले आहेत. ज्यातमध्ये ॲनिमेटेड बॅकग्राउंड, कस्टमाइज थर्ड-पार्टी स्टीकर्स इम्पोर्ट करने, एक वेगळा बॉट मेन्यू यांसारखे फीचर्स समाविष्ट आहेत.



हे हि वाचा – What’s Appचे View Once फिचर लाँच, आता मेसेज सीन केल्यावर होणार गायब

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -