घरटेक-वेकआता बँकाही म्हणणार, 'व्हॉटसअप'!

आता बँकाही म्हणणार, ‘व्हॉटसअप’!

Subscribe

प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात हल्ली फक्त व्हॉटसअपने होत असते. गुडमॉर्निंगपासून ते गूड नाईटपर्यंतचे सगळे मेसेज आपल्याला दिवसभरात येत असतात. कधी या मेसेजेसचा इतका वीट येतो की, हे मेसेजेस नको वाटतात. आता यात भर म्हणून की काय, तुमच्या बँकादेखील तुम्हाला ‘व्हॉटसअप’ करणार आहे. आता ते कसं असा प्रश्न पडला असेलच.

बँका घेणार व्हॉटसअॅपची मदत

बँका तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी व्हॉसअॅपची मदत घेणार आहे. या आधी बँका तुम्हाला एसएमएसमधून अपडेट ठेवत होत्या. पण आता व्हॉटसअॅपच्या ऑफिशिअल नंबरवरुन तुम्हाला बँका अपडेट ठेवणार आहेत. प्रत्येक बँका एक स्वतंत्र नंबर घेणार असून ते अकाऊंट तपासून घेतलेले असणार आहे. तुम्ही एटीएममधून पैसे काढल्यानंतर तुम्हाला तुमचा बॅलेंस आधी मेसेजमधून कळत होता. पण आता तो व्हॉटसअॅपवर येईल.

- Advertisement -

कसं काम करणार बँकांच व्हॉटसअप

ग्राहकांचा गोंधळ उडू नये यासाठी प्रत्येक बँकेचा एक ठरलेला व्हॉटसअपएटीएसममधून पैसे काढल्यानंतर तुमची बँक तुमचा बॅलेंस तुम्हाला मेसेज करते. अगदी तसेच तुम्हाला व्हॉटसअपमध्ये मेसेज येणार आहेत. शिवाय पॅन नंबर, आधार नंबर अपडेट करण्यासाठी या व्हॉटसअपचा उपयोग करता येईल का ? हे विचाराधीन आहे. कारण अनेकांना कामांच्या वेळा सांभाळून बँकमध्ये येणे कठीण होते. अशांना त्यांच्या शंकाचे निरसन व्हॉटसअॅपमधून व्हावे यासाठी ही बँका काम करत आहेत.

व्हॉटसअॅपचा ‘ऑफिशिअल’ वाढला वापर

हल्ली ऑफिसपासून ते पार्लर सर्व्हिसेसपर्यंत सगळेच हल्ली ग्राहकांपर्यंत स्किम पोहोचवण्यासाठी व्हॉटसअॅपचा वापर करतात. त्यामुळे एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळत असते. शिवाय हल्ली प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉटसअॅप असतेच. हे हेरुनच अनेकांनी ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करुन ग्राहकांना जोडून ठेवले आहे. एकाचवेळी अनेकांना झटपट मेसेज पाठवण्यासाठी व्हॉटसअॅपचा वापर केला जातो. त्यामुळे हे चॅटिंग अॅप अवघ्या काही दिवसातच अनेकांनी डाऊनलोड केले. आजही इतर अॅपच्या तुलनेत व्हॉटसअॅपचा जास्तीत जास्त वापर केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -