घरटेक-वेकअसा असणारा 'रिअलमी २'

असा असणारा ‘रिअलमी २’

Subscribe

रिअलमी फोनची खासियत त्याची डीझाईन आणि किंमत आहे. या फोनची किंमत रिअल मी १ च्या आसपास असणार आहे.

ओपोचा सब ब्रँड असलेल्या रिअलमी देखील अनेकांच्या पसंतीला उतरला आहे. रिअलमी १ च्या सक्सेसनंतर आता रिअलमी २ या फोनची वाट अनेकजण बघत होते. पण आता या फोनची प्रतिक्षाही संपली आहे. कारण ओपो रिअलमी २ या नव्या फोनचा लूक नुकताच रिअलमी कंपनीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन पोस्ट केला आहे. पण आता हा फोन  विक्रीसाठी कधी बाजारात येणार याची उत्सुकता मात्र कंपनीने तशीच ठेवली आहे.

ओपो F7 सारखाच असणार फोन?

रिअलमी १ या फोनला ऑनलाईन वेबसाईटवरुन चांगला प्रतिसाद मिळाला होता. या फोननंतर रिअलमी २ लवकरच येणार अशी घोषणा देखील रिअलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी केली होती. पण हा फोन कसा असणार ?अशी उत्सुकता या फोनच्या चाहत्यांमध्ये असेल तर हा फोन ओपोच्या F7 सारखाच असल्याचे वाटत आहे. कारण कंपनीने पोस्ट केलेला हा फोटो ओपो F7 सारखाच आहे. शिवाय बेझल- लेस डिस्प्ले आणि ओपोची सिग्नेचर डाएमंड डीझाईन असे काही फोन फिचर या फोटोमधून दिसत आहेत.

- Advertisement -
oppo f7
ओपोचा F7 फोन

बजेटमध्ये असणार फोन?

रिअलमी फोनची खासियत त्याची डीझाईन आणि किंमत आहे. या फोनची किंमत रिअल मी १ च्या आसपास असणार आहे. साधारण १० हजार ते २० हजार या घरात या फोनची किंमत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या फोनच्या सेल संदर्भातील बातमी लवकरच देण्यात येणार असल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कोणते नवे फिचर असणार ?

फ्रिंगर प्रिंट, ड्युअल कॅमेरा हे फिचर रिअलमीमध्ये नव्हते. पण आता याचा समावेश यामध्ये केला जाणार आहे. याशिवाय अनेक नवे फिचर या फोनमध्ये असणार आहे. आता फक्त हा फोन लाँच होण्याची अनेकजण वाट पाहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -