घरटेक-वेकआता ७ दिवसांत Whatsappचे मेसेज होणार गायब, कसे ते जाणून घ्या

आता ७ दिवसांत Whatsappचे मेसेज होणार गायब, कसे ते जाणून घ्या

Subscribe

अलीकडे Whatsappने आपल्या FAQ पेजमध्ये Disappearing Message कसे काम करेल याबाबत सांगितले होते. आता कंपनीने हे नवे फिचर अधिकृतरित्या लाँच केले आहे. Whatsappची सहयोगी कंपनी असलेल्या फेसबुक (Facebook)ने एक प्रेस नोट जारी करून Whatsappमध्ये Disappearing Message लाँच केल्याचे घोषणा केली आहे.

फेसुबकने सांगितले आहे की, ‘Whatsappमधील काही बातचित वैयक्तिक ठेवण्याच्या उद्देशाने Disappearing Messageची सुरुवात करत आहे.’ फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, Whatsappवर जेव्हा Disappearing Message ऑन असेल तेव्हा या दरम्यान सर्व मेसेज सात दिवसांत गायब होऊन जातील. यामुळे Whatsapp चॅटला जास्त पर्सनल आणि सिक्योर ठेवू शकता, असे कंपनीला वाटते.

- Advertisement -

Whatsapp इंडिव्हिजुअल चॅट म्हणजे वन ऑन वन बातचित दरम्यान तुम्ही दोघांपैकी कोणीही Disappearing Message ऑन ऑफ करू शकता. ग्रुप्समध्ये हे ऑप्शन फक्त Adminsला मिळेल.

फेसबुकने सांगितले आहे की, ‘Whatsappमध्ये मेसेज गायब होण्यासाठी ७ दिवस दिले गेले आहेत. या फिचर अपडेट करण्यासाठी सर्वांना हाच महिना दिला गेला आहे. आयफोन, अँड्रॉइड आणि KaiOS ग्राहकांना फिचर दिले गेले आहेत.’

- Advertisement -

हेही वाचा – Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! ३ महिन्यांसाठी YouTube प्रिमियम सबस्क्रिप्शन मिळणार फुकट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -