घरठाणेठाणे जिल्ह्यात सर्वाधिक २,५३८ कोरोना रुग्ण ,११ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक २,५३८ कोरोना रुग्ण ,११ जणांचा मृत्यू

Subscribe

ठाणे जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही कोरोना रुग्णांची संख्या ही दोन हजारांहून अधिक आढळून आली आहे. तर एकीकडे रुग्ण संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे मृतांचा आकडा वाढताना दिसू लागला आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे २ हजार ५३८ रुग्ण सापडले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात नोंदणी झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ९३ हजार १५४ इतकी झाली असून मृतांचा आकडा ६,४०३ वर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक ७७५ रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. केडीएमसीत सर्वात जास्त म्हणजे तिघांचा मृत्यू झाला आहे. तर भिवंडी आणि ठाणे ग्रामीण हे भाग वगळता इतर ठिकाणी मंगळवारी १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठामपा कार्यक्षेत्रात ७७५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ७० हजार २१७ झाली आहे. शहरात एकाच मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या १ हजार ४३० झाली आहे. कल्याण – डोंबिवलीत सर्वाधिक ७११ रुग्णांची वाढ झाली असून आजची मृत्यू संख्या ३ आहे. नवी मुंबईत ४५६ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू संख्या दोन झाली आहे. उल्हासनगरमध्ये १२३ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत ३९ बाधितांची नोंद झाली आहे.

- Advertisement -

मीरा भाईंदरमध्ये १७० रुग्ण आढळले असून एक जण दगावला आहे. अंबरनाथमध्ये १०६ रुग्ण सापडले आहेत. तसेच दोघे दगावले आहेत. कुळगाव- बदलापूरमध्ये ११२ रुग्णांची नोंद झाली असून ठाणे ग्रामीणमध्ये ४६ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात बाधितांचा आकडा हा २० हजार ४६८ झाला असून ६०३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात भिवंडी आणि कुळगाव बदलापूर येथे या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -