घरठाणेपाणी बिलांची थकबाकीच्या 4 हजार 430 नळ जोडण्या वर्षभरात तोडल्या

पाणी बिलांची थकबाकीच्या 4 हजार 430 नळ जोडण्या वर्षभरात तोडल्या

Subscribe

पाणी बिल भरावे अन्यथा एक एप्रिलपासून नळ जोडणी बंद

ठाणे । जल देयके थकविणार्‍यांवर ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई केली असून एप्रिल 2023 ते मार्च 2024 या काळात 4 हजार 430 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बील भरण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत, त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई एक एप्रिलपासून सुरू करण्यात यणार आहे. ठाणे महापालिकेला सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 201 कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 114 कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षाची पाणी देयके जमा केलेली नाहीत, त्यांनी 31 मार्चपर्यंत सगळी देयके जमा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रशासकीय आकारात 100 टक्के सूट
जे घरगुती नळ संयोजन धारक 31 मार्च 2024पर्यंत थकीत पाणी बिल, चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील, त्यांना त्या थकित बिलावरील प्रशासकीय आकारातून 100 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केली आहेत त्यांना, तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाही.

- Advertisement -

प्रभाग समिती – खंडित नळ जोडण्या

मुंब्रा – 905
कळवा – 796
नौपाडा-कोपरी – 682
वागळे – 660
दिवा – 553
लोकमान्य – सावरकर नगर 398
उथळसर – 283
वर्तकनगर – 89
माजिवडा-मानपाडा – 64
एकूण – 4430

- Advertisement -

पाणी देयकांचा वसुली तक्ता-
प्रभाग समिती – टक्के
वर्तकनगर – 71.58
माजिवडा-मानपाडा – 66.61
लोकमान्य – सावरकर नगर – 65.97
उथळसर – 64.24
नौपाडा-कोपरी – 61.43
मुंब्रा – 50.62
कळवा – 55.33
वागळे – 39.81
दिवा – 36.85
एकूण – 56.61

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -