घरठाणेमोठ्या रकमेचे आमिष दाखवून उल्हासनगरात साडे पाच कोटी रुपयांचा गंडा

मोठ्या रकमेचे आमिष दाखवून उल्हासनगरात साडे पाच कोटी रुपयांचा गंडा

Subscribe

तब्बल 43 जणांची फसवणूक

सदगुरु डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिक कंपनीत गुंतवणूक केलेल्या 37 गुंतवणुकदारांची तब्बल साडे पाच कोटी रुपयांचा गंडा लागल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाअंती मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातला मुख्य आरोपी मनमोहन आयलसिंघानी यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. कल्याणात राहणारे किशोर दादलानी यांचा बेकरीचा व्यवसाय आहे. त्यांचे उल्हासनगरात कार्यालय आहे. त्यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून कल्याण आणि उल्हासनगर भागात नव्याने सुरु होत असलेल्या इमारतीमध्ये कमी रकमेत दुकाने, घरे अथवा जादा रक्कम परत देण्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून 43 जणांनी वेळोवेळी एकूण ५ कोटी ५४ लाख रुपये गुन्हा दाखल झालेल्या आठ बांधकाम विकासकांच्या कार्यालयात धनादेशने दिले होते. काही महिने गुंतवणूकदारांना परतावा ही देण्यात आला.

त्यानंतर गुतवणूकदार परतावा मागणीसाठी २०१९ ला गेले असता दाखल झालेल्या संबंधित आठही जणांनी गुतवणूकदारांना दिलेल्या रक्कमेचा परतावा न करताच ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने २३ नोंव्हेबर २०२१ रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात  सुंदर बजाज, लाल बजाज, हिरासिंग आइलसिंघानी, मनमोहन आइलसिंघानी, फेरू लुल्ला, नंदलाल लुल्ला आणि दलाल गोविंद मनचंदा व ओम मनचंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातला आरोपी मनमोहन आयलसिंघानी परदेशात गेल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे आयलसिंघानी याला लुकआऊट नोटीसवर ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी आयलसिंघानी हा परदेशातून आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -