घरठाणेजिल्ह्यात 506 अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

जिल्ह्यात 506 अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

Subscribe

ठाणे । अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीर आणि मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत: समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत असतात. यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केलेली आहे. या समितीची बैठक नुकतीच पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर येथे ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. आतापर्यंत एकूण 506 आरोपीस अटक करण्यात आली आहे. सेवनार्थीच्या 483 केसेस दाखल करण्यात आल्या असून अशा प्रकारे एकूण 36 लाख 65 हजार रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या 483 गुन्ह्यांमध्ये एकूण 506 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

या बैठकीस ठाणे शहर पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त इंद्रजित कार्ले, अन्न व औषध विभाग, ठाणे औषध निरीक्षक रा.दि.शिंदे, जिल्हा सामान्य रूग्णालय, ठाणे डॉ. विक्रम काकडे, जिल्हा कृषी विभाग, ठाणे डॉ. अर्चना नागरगोजे, जिल्हाधिकारी कार्यालय, मंडळ अधिकारी शशिकांत जगताप हे सदस्य तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय रामचंद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक भारत कामत अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा, ठाणे हे उपस्थित होते. या बैठकीत अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. उगले यांनी बंद रासायनिक कंपन्यांबाबत तपासणी करणे, मेडिकल स्टोर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय कफ सिरपची तसेच गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्यास कारवाई करावी, एनडीपीएस संदर्भात प्रशिक्षण आयोजित करणे, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ज्या ठिकाणी गांजा व खसखस यांची लागवड होत असल्यास जिल्हा कृषी अधिकारी यांनी स्थानिक पोलीस किंवा अमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करावी, पोस्ट अधिकारी व खाजगी कुरियर कंपनी यांनी संशयित पार्सल किंवा कुरियर आढळून आल्यास स्थानिक पोलीस किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करण्याबाबत, लोकांमध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याचे व सर्व संबंधितांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.
एक जानेवारी 2024 ते 23 जानेवारी 2024 पर्यंत गांजाबाबतच्या 5 केसेस दाखल झाल्या असून 1 लक्ष 38 हजार रुपये किंमतीचा 6 किलो 529 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे, आतापर्यंत यासोबत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मोफेड्रॉनबाबतच्या 2 केसेस दाखल झाले असून 5 लक्ष 80 हजार रुपये किंमतीचा 136 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. चरसबाबतच्या 29 लक्ष 38 हजार रुपये किंमतीचा 4 किलो 850 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधनेबाबत 1 केस दाखल झाली असून 90 हजार रुपये किंमतीचा 30 बॉटल्स औषधे व सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 1 आरोपीला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांचे सेवनाबाबत 475 केसेस दाखल झाले असून आतापर्यंत यासोबत एकूण 495 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -