घरठाणेकामगाराची हत्या करून पळालेल्या आरोपीस कल्याण रेल्वे स्थानकात अटक

कामगाराची हत्या करून पळालेल्या आरोपीस कल्याण रेल्वे स्थानकात अटक

Subscribe

भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावात कंपनीत काम करत असताना ट्रॉलीचा धक्का लागल्याने कंपनीतील कामगाराने लोखंडी हॉकीबेंडची उपट घातल्याने ट्रॉलीच्या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगाराची हत्या करून पळून जाणाऱ्या आरोपीस पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली. शफाउद्दीन राहत हुसेन (३१) असे मृत कामगाराचे नाव असून तो भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीत असलेल्या माल्टा कंपनीत काम करीत होता. काल रविवारी २६ मार्च रोजी नेहमी प्रमाणे आरोपी आणि मृत कामगार कंपनीत काम करत असताना दुपारी ११ वाजल्याच्या सुमारास मृतक शफाउद्दीन हा कंपनीतील एका ट्रॉलीमध्ये साहित्य टाकून नेत असताना अचानक आरोपी कामगार मोहंमद हनीफ याला ट्रॉलीचा धक्का लागला होता. यावरून दोघात वाद होऊन आरोपी मोहंमद हनीफ याने कंपनीतील लोखंडी हॉकीबेंडच्या पाईपने मृत शफाउद्दीन जोरात उपट घातली.

या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन शफाउद्दीन ठार झाला. त्यानंतर आरोपी मोहंमद हनीफ हा घटनास्थळावरुन फरार झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांच्या पथकाने कंपनीत दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मतकर, पोलीस नाईक जयवंत मोरे, बाळा जाधव, केदार, मुकादम, वाळींबे या पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा उत्तरप्रदेश मध्ये पळून जाण्यासाठी कल्याण येथे गेला आहे. तेंव्हा पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचून आरोपी मोहंमद हनीफ इस्माईल (२४) यास अटक केली. त्यास २७ मार्च रोजी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मतकर करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -