घरठाणेठाण्यात निर्बंधांची पहिल्याच दिवशी ऐशी की तैशी

ठाण्यात निर्बंधांची पहिल्याच दिवशी ऐशी की तैशी

Subscribe

शासनाच्या त्रिसूत्री नियमांची शहरात ठिकठिकाणी पायमल्ली असताना दिसून येत होती. ठाणे महापालिका कार्यक्षेत्र हे दुसऱ्या स्तरात मोडत असताना सोमवार पासून अत्यावश्यक सह इतर आस्थापनाही सुरु झाल्या.

अनलॉकच्या पहिल्याच ठाणेकर नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याने बाजारपेठ फुलून गेली होती. तसेच वाहनांची वर्दळ वाढल्याने शहरातील महत्वांच्या रस्त्यांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा पाहण्यास मिळाल्या. विशेष करून मान्सूनला सुरू झाल्याने नागरिकांनी पावसाळी साहित्य खरेदीवर विशेष भर दिला. दुसरीकडे शासनाच्या त्रिसूत्री नियमांची शहरात ठिकठिकाणी पायमल्ली असताना दिसून येत होती. ठाणे महापालिका कार्यक्षेत्र हे दुसऱ्या स्तरात मोडत असताना सोमवार पासून अत्यावश्यक सह इतर आस्थापनाही सुरु झाल्या. शहरातील विविध रस्त्यांना लावण्यात आलेले बॅरीकेट्स हटवले गेले. मॉर्निग वॉक, संध्याकाळचा वॉकही मास्क विनाच सुरु असल्याचे दिसून आले. शहरातील सलून ,व्यायामशाळा ही सुरु झाल्या, मॉल, शॉपींग सेंटरही ५० टक्के क्षमतेने सुरु झाले आहेत. परंतु याठिकाणी देखील खरेदीसाठी नागरीकांची गर्दी दिसत होती.

 

- Advertisement -

सलुनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात असल्याचे दिसत होते. तसेच जीमध्ये देखील सॅनिटायझर करुनच सराव सुरू झाला.दुसरीकडे ठाण्यातील जांभळी नाका मार्केटमधील सर्वच दुकाने आता खुली झाल्याने या ठिकाणी पावसाळी खरेदीसाठी नागरीकांची एकच झुंबड उडाल्याचे दिसत होते. चप्पला, रेनकोट, छत्री, ताडपत्री घेण्यासाठी नागरीकांची गर्दी वाढतांनाच दिसत होती. त्यामुळे कुठेही सोशल डिस्टेंसींगचे पालन होतांना दिसत नव्हते. सकाळी कामानिमित्त मुंबईच्या दिशेने निघालेल्या वाहनांमुळे आनंद नगर टोलनाक्यावर पुन्हा एकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहण्यास मिळाल्या. त्यातच, शहरातील कोर्टनाक्यापासून ते थेट ठाणे स्टेशनपर्यंत केवळ गर्दीमुळे या भागात वाहतुक कोंडी झाली होतीे. गर्दी आणि वाहतुक कोंडीमुळे शहरात शिथिल केलेल्या निर्बंधाची ऐशी की तैशी झाल्याचे दिसून येत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -